श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यच्या नूतन संचालक मंडळाची बैठक संपन्न
शिवशाही वृत्तसेवा मंगळवेढा ( राज सारवडे )
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन निवडीनंतर दि. २९/७/२०२२ रोजी झालेल्या पहिल्या संचालक मंडळ सभेत कारखान्याच्या आर्थिक हितास प्राध्यान्य देवून महत्वपुर्ण व दुरगामी परिणाम करणारे धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेची माहिती नुतन चेअरमन श्री शिवानंद पाटील यांनी दिली. श्री संत दामाजी साखर कारखाना हा मंगळवेढा तालुक्यातील राजवाडा आहे. कारखाना कार्यक्षेत्रात जमीनीचा ७/१२ असणाऱ्या प्रत्येक इच्छुक शेतकऱ्याना भागभांडवल रु.१००००/- व प्रवेश फी रु.१००/- भरुन घेवून जागेवर पावती देवून आज पासून कारखान्याचे सभासद करुन घेणार आहोत. तरी जास्तीत-जास्त शेतकरी बंधूनी कारखान्याचा शेअर्स घेवून सभासद व्हावे. तसेच ज्या सभासदांचे शेअर्स अपुर्ण आहेत त्यांनी अपुर्ण रक्कम भरुन घेवून शेअर्स पुर्ण करुन घ्यावा. याशिवाय कारखान्याचे जे सभासद दुर्देवाने मयत झालेले आहेत त्यांच्या वारसांनी कारखाना कार्यालयात संपर्क साधून आवश्यक ती कागदपत्रांची पुर्तता करुन घ्यावी, म्हणजे वारसांची नोंद करुन घेणे सोयीचे होईल.
तसेच सभेत नुतन संचालक मंडळ मिटींग भत्ता घेणार नाहीत. कारखान्याचा मोबाईल किंवा सिमकार्ड आमचे संचालक मंडळ वापरणार नाहीत. कारखान्याची आर्थिक घडी चांगल्याप्रकारे बसवून व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ सदस्य, अधिकारी, कर्मचारी, सभासद, तोडणी वाहतुक ठेकेदार या सर्वांच्या सहकार्याने प्रत्येक निर्णय घेताना काटकसरीचे धोरण अवलंबून येणारा सन २०२२-२३ चा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडणार आहोत. यासाठी आवश्यक असणाऱ्या ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा भरतीचे काम पुर्ण होत आलेले आहे. मंगळवेढ्याचा आठवडा बाजार हा सोमवारी असल्याने संस्थापक चेअरमन स्व.मरवाडी वकीलसाहेब व व्हा.चेअरमन स्व.शहा शेठजी यांनी कारखान्यातील कामगारांना सोईची साप्ताहिक सुट्टी सोमवारी दिलेली होती. परंतु मागील संचालक मंडळाने सदरची सुट्टी शनिवारी केलेली होती.
कारखान्यातील कामगारांच्या मागणीप्रमाणे निवडणुक काळात वेळोवेळी वरिष्ठ नेत्यांनी प्रचारात दिलेल्या शब्दाप्रमाणे साप्ताहिक सुट्टी यापुढे सोमवारी देण्याचा निर्णय संचालक मंडळ सभेत झाल्याचे चेअरमन श्री शिवानंद पाटील यांनी सांगितले. सदर प्रसंगी व्हा.चेअरमन तानाजी खरात, संचालक मुरलीधर दत्तु, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणु पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुबंर वाडदेकर, रेवणसिध्द लिगाडे, भिवा दोलतोडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, पी.बी. पाटील, दिगबंर भाकरे, महादेव लुगडे, अशोक केदार, तानाजी कांबळे, संचालिका सौ.निर्मला काकडे, सौ.लता कोळेकर तसेच कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, कामगार संघटनेचे पदाधिकारी, पतसंस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा