maharashtra day, workers day, shivshahi news,

मंगळवेढा पंचायत समिती समोर शेतकऱ्यांची बोंबाबोंब आणि जागरण गोंधळ

प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेचे प्रशासनाविरोधात आंदोलन

prahar janshakti sanghatana, bacchu kadu, panchayat samiti, mangalwedha, shivshahi news

शिवशाही वृत्तसेवा मंगळवेढा ( राज सारवडे )

मंगळवेढा तालुक्यातील गटविकास अधिकारी कार्यालया समोर प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेने  शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत  बोंबाबोंब आंदोलन केले प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेचे सोलापूर शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी म्हणाले की मुजोर अधिकाऱ्यांना प्रेमाची भाषा कळत नसेल त्याचबरोबर बोंबाबोम आंदोलन करून त्यांना जाग येत नसेल, तर यापुढे प्रहार स्टाईलनेच आंदोलन केली जातील. 

प्रत्येक ऑफिसमध्ये प्रहार स्टाईल ची आंदोलनाची दखल वेगळ्या पद्धतीने घेतली जाते. परंतु या ठिकाणी मंगळवेढा गट विकास अधिकारी कार्यालयासमोरील या पुढील आंदोलनाची दिशा वेगळी असेल, त्यावेळेस मात्र तुम्हाला मोठा पोलीस  बंदोबस्त घेण्याची आवश्यकता भासेल. यानंतर प्रहार संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा.संतोष पवार म्हणाले की प्रहार स्टाईल वापरण्याची वेळ येऊ देऊ नका.. नाहीतर पहिले बात फिर मुलाकात और जरूरत पडे लाथ.. यापेक्षा पहिले लाथ जरूरत पडे तो.? असे म्हणत आक्रमकतेने यापुढील काळात आंदोलने केली जातील. 

दोन दिवसात सर्व मागण्या मान्य न झाल्यास प्रहार स्टाईलने आंदोलन केले जाईल. मंगळवेढा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी म्हणाले की, आमच्या शांतीच्या आंदोलनाचा अर्थ असा घेऊ नका की आम्ही कमजोर आहोत. शांतीच्या आंदोलनात आम्ही शेकडो युवक घेऊन येऊ शकतो.. तर यापुढील आक्रमक आंदोलनासाठी हजारो युवक या ठिकाणी येतील. त्यावेळेस मात्र होणारे परिणामास शासन व प्रशासन जबाबदार असेल. तसेच प्रत्येक ग्रापंचायतीने डिजिटल फलक लावावेत,तसेच सर्व ग्रामसेवकांनी सज्जा ठिकाणी राहून काम करावे,त्याचबरोबर 

तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती ने अपंगांचा निधी तात्काळ वाटप करावा, या मागणीसाठी आंदोलन केल.याच बरोबर 75 वर्षे देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाहीत ही शोकांतिका आहे.आज आपले हक्क ,सुविधा ,योजना मिळवण्यासाठी फकत  आपणाला भांडायच आहे, या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कित्येकजण फासावर गेले,काहींनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली,काही जणांनी तुरंगवास भोगला, आज ती परिस्थिती नाही. त्यामुळे गावकरी, शेतकरी यांनी जे मागून मिळत नाही ते मिळवण्यासाठी वेळ पडली रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शवावी आम्ही तुमच्या सोबत असू तुम्ही एक पाऊल टाका आम्ही तुमच्या साठी चार पाऊले टाकू.असे मत व्यक्त केलं 

याबरोबर काही शेतकऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी भाग घेत आंदोलकांना मार्गदर्शन केले. आंदोलन उशीर पर्यंत लांबल्याने आंदोलनाचे स्वरूप बोंबाबोम आंदोलन ते जागरण गोंधळ आंदोलन इथपर्यंत चालले. बोंबाबोब आंदोलनामध्ये प्रशासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या..... तर जागरण गोंधळ घालत शासनाच्या गोंधळाचा पाढा या ठिकाणी वाचण्यात आला.. यावेळेस प्रशासनातील व उपस्थित आंदोलकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. 

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ मस्के पाटील, कार्याध्यक्ष खालिद मणियार, जिल्हा संपर्क प्रमुख जमीर भाऊ शेख, जिल्हा प्रसिध्द प्रमुख राजू सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी पाटील  तालुका कार्याध्यक्ष अमोगसिद्द काकनकी,शहर अध्यक्ष सचिन साळुंखे,मनसेचे ता. संघटक भास्कर चौगुले,प्रहार जनशक्ती पक्ष शहर संपर्क प्रमुख सिद्धेश्वर पाटील, तानाजी माने,बापू घोडके, तालुका उपाध्यक्ष  चेतन वाघमोडे,दत्ता पाटील,बापू मरीआई वाले,विलास सरगर विभाग प्रमुख नवनाथ  सिरशटकर,महिला विभाग प्रमुख सारिका कवचाळे,विठ्ठल वाघमारे, बोराळे गावचे युवा नेते तानाजी जाधव, शैलेश रणदिवे, बबलू ढवळे, रवींद्र चौगुले, बसाप्पा कोळी, श्रीरंग शिंदे, शशी कोळी, दत्ता निर्मळ,विठ्ठल वाघमारे, शैलेश रणदिवे, बबलू ढवळे, रवींद्र चौगुले, बसाप्पा कोळी, श्रीरंग शिंदे, शशी कोळी, दत्ता निर्मळ,श्रावन घोडके, बाबा इनामदार, हैदर इनामदार, शिवाजी चौगुले, चांदतारा शेख, मनीषा घोडके, पुजारी, तानाजी जाधव,  बंडू सगेलकर, दादा वाघमारे, माऊली लोहार,महेश तळे, मल्लू तळे ,प्रज्वल मलकारी, आप्पाराया काकणकी,सचीन कवचाळे,राघवेंद्र येणपे, अल्लाउद्दीन अन्सारी, पिंटू कपले सिद्धापूर् गावचे युवा नेते सचिन सावकार चौगुले, संतोष परीट बिळू पाटील, सिद्धाप्पा काकणकी, बालाजी मळगे, काशिनाथ मळगे, गजानन चौगुले, रविकांत जाधव, शेलु पाटील, विकास कोळी ,शंकर कुंभार, विजय काकणकीसुरेश बुरंगें , मारुती पवार, समाधान निकम, योगेश घाडगे, बबलू पंवार, सुभाष सलगर ,तुलसीराम सोनवणे, विकास आकले,राजू नागणे,नामदेव सुरवसे,किरण उन्हाले ,श्रीशैल माने,जगू सोनवणे विकास आकळे,सतीश मेटकरी,तात्या खिलारे,माऊली शिंदे,राजू सय्यद,दशरश भोरे ,अंबादास माने,ज्ञानेश्वर माने, सचिन काले,लल्या पवार, हिम्मत वाघमारे,सिताराम मेटकरी आदी पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते. 

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !