शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करुन विश्वास सार्थ ठरविणार - चेअरमन शिवानंद पाटील
शिवशाही वृत्तसेवा मंगळवेढा ( राज सारवडे )
संत दामाजी साखर कारखान्याच्या निवडणूकीमध्ये तालुक्यातील सभासद-शेतकरी यांनी समविचारी आघाडीच्या उमेदवारांवर विश्वास ठेवून एकहाती सत्ता दिली आहे. दामाजी साखर कारखाना हा शेतक-यांचे मंदिर आहे. या मंदिराचे पावित्र्य राखण्याचे काम नुतन संचालक मंडळ करणार आहे. तसेच या संचालक मंडळावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवून, सर्वांना सहकार्य व योग्य न्याय देण्याचे काम हे संचालक मंडळ करणार आहे. असे प्रतिपादन संत दामाजी कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी केले मरवडे येथे आयोजीत नुतन संचालक मंडळ सत्कार समारंभात ते बोलत होते.
याप्रसंगी मरवडे ग्रामस्थांच्यावतीने नुतन चेअरमन श्री शिवानंद पाटील, व्हा. चेअरमन श्री तानाजी खरात तसेच नुतन संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष व धनश्री परिवाराचे मार्गदर्शक प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी मनोगतामध्ये दामाजी कारखान्याच्या कारभाराविषयी सविस्तर विचार मांडले. तसेच नुतन संचालक मंडळाला त्यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्तावीक करताना लतिफ तांबोळी म्हणाले मरवडे गावातून उमेदवारी न घेताही मोठ्या भावाची जबाबदारी पार पाडली आहे. आता येथून पुढे भविष्यात होणा-या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत मरवडे गावातून उमेदवार देवून न्याय द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सदर प्रसंगी माजी आरोग्य विस्तार अधिकारी डॉ. माणीक पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, दामाजी कारखान्यास ऊस घालणा-या सभासदांना सवलतीच्या दराने मळी उपलब्ध करुन द्यावी. तसेच नवीन संचालक मंडळाने सभासदत्व खुले केल्याबध्द्ल संचालक मंडळाचे अभिनंदन केले. व त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
धनश्री परिवाराचे मार्गदर्शक प्रा. शिवाजीराव काळुंगे, बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन दामोदर देशमुख, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहूल शहा, जितामाता पतसंस्थेचे प्रमुख रामकृष्ण नागणे यांनी दामाजी कारखान्यास पतपुरवठा करण्याची तयारी दर्शविली. याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने त्यांचेही आभार मानले. या सत्कार समारंभास दामाजी कारखान्याचे नुतन संचालक सर्वश्री औदुंबर वाडदेकर, गौरीशंकर बुरकूल, राजेद्र चरणु पाटील, भारत बेदरे, रेवणसिध्द लिगाडे, दिगंबर भाकरे, तसेच जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप, माजी संचालक नामदेव गायकवाड, मा.सरपंच दादा पवार, भारत मासाळ सर, मा.सरपंच अशोक पवार, गोविंद चौधरी, सुभाष भुसे सर, संभाजी रोंगे सर, सिध्देश्वर रोंगे सर, मनोहर बनसोडे, दौलत माने, भाजपा तालुका उपाध्यक्ष श्रीकांत गणपाटील, मा.सरपंच नितीन घुले, संदिप सुर्यवंशी, पांडुरंग मासाळ, दत्तात्रय मासाळ, महेश गणपाटील, लहू मासाळ, बजरंग गायकवाड, सचिन घुले, निलेश स्वामी, सुभाष शिवशरण, भाऊसाहेब तेली, विजय माने, राजु घोडके, बंडू शेणवे, विकास दुधाळ तसेच मरवडे पंचक्रोशीतील सर्व हितचिंतक, ग्रामस्थ, समविचारी आघाडीतील सर्व प्रमुख पदाधिकारी, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.संतोष पवार यांनी केले, तर आभार मा.सरपंच नितीन घुले यांनी मानले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा