राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा
शिवशाही वृत्तसेवा,मंगळवेढा राज सारवडे
मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथील सामाजिक कार्यकर्ते हनुमंत दुधाळ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध राजकीय पक्षाचे व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर उजनीच्या पाणीप्रश्नावर आणि विविध सामाजिक प्रश्नांवर आक्रमक आंदोलन करून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी धडपडणारे सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर भैया देशमुख यांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला
याप्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी झालेल्या कार्यक्रमात बबनराव अवताडे भगीरथ भालके दौलतराव माने कामानंद हेगडे, कुरूमुत्ते सर मारुती पेटर्गी, हनुमंत शिवशरण विकास दूध आन श्रीकांत लव्हटे किसन गवळी विरकर सर भैया जाधव अजित कुलाळ संदीप जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम शिवक्रांती ग्रुपच्यावतीने अध्यक्ष रविराज उर्फ बंडू शेनवे यांनी आयोजित केला होता
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा