खराब रस्त्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष
मंगळवेढा प्रतिनीधी राज सारवडे
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळेच मांगीजवळ झालेल्या अपघातात .देवळाली येथील तरुणाचा बळी गेला आहे. वेळीच खड्डे बुजले असते तर तरुणाचा अपघातात मृत्यू झाला नसता अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. वेळोवेळी पाठपुरावा करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
करमाळा- अहमदनगर राज्य महामार्गावर मांगी येथील पुलाजवळ ट्र्क व दुचाकीचा अपघात होऊन वसंत मारुती शिंदे (वय २८) तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. रविवारी (ता. २९) सकाळी ७ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. ठार झालेले शिंदे हे भंगाराचा व्यवसाय करतात. करमाळ्याकडून जातेगावच्या दिशेने ते जात होते. तेव्हा त्यांच्या दुचाकीला अपघात झाला.
वारे म्हणाले, करमाळा ते जातेगाव राज्य मार्गावर मांगी येथील पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. याची दुरुस्ती करण्याची मागणी आम्ही वेळोवेळी केली आहे. मात्र जेथे आंदोलन होत आहे तेथेच तात्पुरती डागडुजी झाली आहे. येत्या काही दिवसातच आषाढीनिमित्त दिंड्या जाणार आहेत. वेळीच याकडे लक्ष दिले नाही तर आणखी धोका होऊ शकतो.रस्त्याची त्वरित दुरुस्ती झाली नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशाराही वारे यांनी दिला आहे. या रस्त्यावर जड वाहतूक मोठ्याप्रमाणात असते. त्यात दुचाकीवर जाणाऱ्या नागिरकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो, असे वारे म्हणले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा