माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते मंचपूजन करून उद्घाटन
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
पंढरपूर नगरीत प्रथमच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त “शिवपूत्र संभाजी” हे महानाट्य अभिजीत आबा पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजीत करण्यात आले आहे. खा. डॉ. अमोल कोल्हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेतून साकारण्यात येत असून या महानाट्याचा तिसरा दिवस आज मोठ्या उत्साहात पार पडला. या महानाट्याच्या तिसऱ्या प्रयोगाचे उद्घाटन माजी सहकारमंत्री सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख उपस्थितीत म्हणून देवळा-चांदवडचे आमदार राहुल आहेर, सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमाला गायकवाड, तहसीलदार सुशील बेल्हेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील, भाजपा मा.जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, लोकमंगल समूहाचे संचालक अविनाश महागांवकर, दिनेश देवरे, माळशिरस भाजपचे के.के पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलतांना सुभाष बापू देशमुख यांनी अभिजित आबा पाटील यांच्यावर कौतुकांचा वर्षाव करत, लोकांना सोबत घेत मोठी कामं पार पडण्याची आबांची कुवत आहे असे वक्तव्य सुभाष देशमुख यांनी केले. याचबरोबर आमदार राहुल आहेर म्हणाले की, पंढरपूर येण्याचा योग म्हणजे आमचा नाशिक येथील साखर कारखाना अभिजित आबा पाटील यांनी तीन वर्षांपासून यशस्वी चालवून ऊस उत्पादक शेतकरी, कामगारांना न्याय दिला आहे.आबांनी एखादे काम हाती घेतले तर त्याचा योग्य अभ्यास, त्याची मांडणी व त्याचे योग्य नियोजन ते करत असतात. याची प्रचीतीही आबांनी सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरल्या गेलेल्या या महानाट्याच्या प्रयोगातून दिसून आली. असे मतही आमदार डाॅ.राहुल आहेर यांनी मांडले.
याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनीही आबांच्या या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पंढरपूर तालुक्यासह आजी माजी नगरसेवक, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा