maharashtra day, workers day, shivshahi news,

शेततळ्यात बुडून बहिण-भावाचा दुर्दैवी अंत - shivshahi news - sangamner - ahmadnagar

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडली दुर्दैवी घटना

Sister - brother drowned, jayashree shinde, ayush shinde, sangamner, ahmadnagar, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, संगमनेर (अहमदनगर)

 कपडे धुण्यासाठी शेततळ्यावर गेलेल्या बहिण - भावाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील मोधळवाडीच्या घाणेवस्ती इथे राहणारे बबन चांगदेव शिंदे यांची मुलगी जयश्री व मुलगा आयुष्य हे कपडे धुण्यासाठी त्यांच्याच शेतातील शेततळ्यावर गेले होते. त्यावेळी आयुष्य शेततळ्यातून पाणी काढत असताना, पाय घसरून तळ्यात पडला. आपला भाऊ तळ्यात पडल्याचे पाहताच त्याला वाचवण्यासाठी, जयश्रीने ही पाण्यात उडी मारली. मात्र पाणी खोल असल्याने दोघेही पाण्यात बुडाले. जयश्री व आयुष हे दोघे पाण्यात पडल्याचे समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी शेततळ्याकडे धाव घेतली. आणि त्या दोघांना बाहेर काढले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. जयश्री व आयुष या दोघा बहीण-भावांचा दुर्दैवी अंत झाला होता. बहिण भावाच्या मृत्यूने पिंपळगाव देपा, मोधळवाडीसह परिसरात शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !