३लाख ३३हजार ३३३ मे.टन गाळप यशस्वी करून सांगोला साखर कारखान्याचा सांगता समारोप संपन्न
कामगारांना बोनस म्हणून १५दिवसांचा पगार
शिवशाही वृत्तसेवा सांगोला
सांगोला तालुक्यातील वाके -शिवणे येथील १२वर्ष बंद असलेला सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना हा धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी चालविण्यास घेतला असून बंद अवस्थेत असलेला हा कारखाना अवघ्या ३५दिवसांत गाळप ही सुरू करून चक्क ३लाख ३३हजार ३३३ गाळप साखर उतारा १०.८५ असून या हंगामाची सांगता करण्यात आली.
यावेळी चेअरमन अभिजीत पाटील म्हणाले की; ३लाख३३हजार३३३ उच्चांक गाळप पुर्ण करण्यात सर्वांचा मोठा वाटा आहे.अडचणीत असलेला कारखाना माझ्या कामगार बांधवांनी, अधिकाऱ्यांनी आणि संचालक मंडळानी रात्रदिवस उभा राहून सुरू केला. वाहतूक ठेकेदारांनी माझ्यावर आणि संचालक मंडळावर विश्वास ठेवत बिगर ॲडव्हान्स वाहतूक केल्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. कारखान्याला यशाची ही एक पायरी चढण्यासाठी अथक मेहनत घेणारे कारखान्याचे सर्व कर्मचार्यांना १५ दिवसांचा पगार बोनस बक्षीस म्हणून जाहीर करण्यात आले. ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूक आणि ऊस तोडणी कामगार आणि विशेषतः कारखान्यावर विश्वास ठेऊन आपला ऊस कारखान्याला घालणारे माझे ऊस उत्पादक शेतकरी बांधव या सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि आभार मानले.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, संचालक संतोष कांबळे, संदीप खारे, आबासाहेब खारे, सुरेश सावंत, दीपक आदमिले यांसह चंद्रभागा सह.साखर कारखान्याचे संचालक दिनकर दाजी चव्हाण, पळशीचे माजी सरपंच नंदूकाका बागल, मा.संचालक प्रगतशील बागायतदार हनुमंत पाटील, प्रा.महादेव तळेकर, जनरल मॅनेजर अविनाश शिंदे तसेच शेती अधिकारी काझी, चीफ इंजिनियर तावरे, चीफ केमिस्ट भोसले यांसह कारखान्यातील कर्मचारी,अधिकारी, शेतकरी ऊस उत्पादक बांधव तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा