मूलभूत विकासाच्या गोष्टीवर शासनाच्या सहकार्याने व अर्थिक मदतीतून चौफेर काम झाले पाहिजे - आमदार समाधान आवताडे
शिवशाही वृत्तसेवा मंगळवेढा
पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामीण भागातील प्रश्न मार्गी लावण्याचा ध्यास घेऊन आ. समाधान आवताडे व जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक हे कार्य करत आहेत. ग्रामीण भागातील शेतीचे पाणी, वीज, आरोग्य, रस्ते, बेरोजगारी या प्रश्नांवर समाधानकारक काम केल्याशिवाय व सदर बाबी धोरणात्मक विकासाच्या अनुषंगाने पूर्णत्वास नेल्याशिवाय आपण शांत बसणार नाही अशी गर्जना आ. समाधान आवताडे यांनी केली आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या अडी - अडीचणी व समस्या जाणून घेण्यासाठी आणि आमदार स्थानिक निधीतून मंजूर झालेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी आ. समाधान आवताडे व जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांनी एकत्रितपणे ग्रामीण भागात गावभेट दौरा सुरु केला आहे.
या गावभेटी दौऱ्यामध्ये आ. समाधान आवताडे व जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांनी शनिवार, दिनांक २३ एप्रिल २०२२ रोजी मंगळवेढा तालुक्यातील घरनिकी, मारापूर, अकोला, गुंजेगाव, महमदाबाद (शे), आंधळगाव, गणेशवाडी, शेलेवाडी, कचरेवाडी व डोंगरगाव या गावांना आमदार महोदय यांनी पंचायत समिती, आरोग्य विभाग, महावितरण कंपनी, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा आदी विभागातील प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी यांच्यासमवेत भेटी दिल्या. सदर गावभेटीवेळी तालुक्यातील विविध गावांमध्ये आ. समाधान आवताडे व जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून जंगी स्वागत केले.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव अनुषंगाने आमदारपदी निवड झाल्यापासून आ. समाधान आवताडे यांना कोरोना निर्बंधामुळे गावभेटी कार्यक्रम घेणे शक्य न झाल्यामुळे आ. तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या अनेक प्रश्न प्रलंबित होते. या गावभेटीवेळी आ. समाधान आवताडे यांनी प्रत्येक गावांमध्ये सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेऊन संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांना प्रश्नांचे निरसन करून मार्गी लावण्याचे भेटीस्थळी आदेशीत केले. आपण विकासकामांचा संकल्प करून लोकप्रतिनिधीची सूत्रे स्वीकारली असून कृतिशील विचारांची कार्यतत्वे राबवून ग्रामीण भागातील माणसे प्रगतीच्या मार्गावर हसती खेळती ठेवून विकासाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नशील आहे असेही आ. समाधान आवताडे यांनी सांगितले आहे.
ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्र विकास, शेतीला शाश्वत पाणी पुरवठा, युवकांना रोजगार, मागणी तसा वीजपुरवठा आदी बाबींवर आपण काम करनार असल्याचे आ. आवताडे यांनी सांगितले आहे. आतापर्यंत केवळ कागदी घोडे नाचवूनच आपण आपल्या मागण्या मांडत राहिलो पण इथून पुढील काळात आपल्या असणाऱ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या पद्धतीने पाठपुरावा करून मागण्या पूर्ण करणार असल्याचे आमदार महोदय यांनी सांगितले. रस्ते, पूल, बंधारे, शिक्षण,वीज, पाणी यासारख्या मूलभूत विकासाच्या गोष्टीवर शासनाच्या सहकार्याने व अर्थिक मदतीतून चौफेर काम झाले पाहिजे असेही आ. समाधान आवताडे यांनी बोलून दाखविले. गोरगरीब जनतेच्या विकासात्मक मदतीसाठी आपण कायमच उपलब्ध असतो. कल्याणकारी योजनांचा सर्वसामान्य जनतेला फायदा करून देण्यासाठी सर्व शासकीय अधिकारी व पदाधिकारी यांनीही शासन, प्रशासन आणि जनता यांच्यामध्ये योग्य समन्व्यय ठेवणे गरजेचे असल्याचेही आ. समाधान आवताडे यांनी सांगितले आहे.
यावेळी पंचायत समिती माजी सभापती प्रदीप खांडेकर, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, शिवानंद पाटील, युन्नूस शेख, भाजपा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर, भाजपा तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकूल, दामाजी शुगर व्हा चेअरमन अंबादास कुलकर्णी, कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ अवताडे, संचालक राजेंद्र सुरवसे, सुरेश भाकरे, सचिन शिवशरण, राजन पाटील, भारत निकम, बापूराव काकेकर, विजय माने, नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे, गटविकास अधिकारी श्रीमती सुप्रिया चव्हाण, कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे, ग्रामीण पाणीपुरवठा राजकुमार पांडव, जि. प. शाखा अभियंता जितेंद्र वाघमारे, सार्वजनिक बांधकाम चे शैलेंद्र गुंड, महावितरण चे चोरमुले, पाटबंधारे विभागचे सिद्धेश्वर काळुंगे आदी अधिकारी तसेच दिगंबर यादव, युवराज शिंदे, युवा मोर्चाचे सुदर्शन यादव आदी अधिकारी, अविनाश मोरे, शरद मोरे, सतिश भुसे, अंकुश क्षिरसागर, बाळासाहेब भुसे, विनायक यादव, बाळासाहेब यादव, राजकुमार यादव, सुब्राव यादव, बाळकृष्ण सुडके, दत्तात्रय नवत्रे, दुर्योधन इंगळे, लखन इंगळे, विठ्ठल इंगळे, रामेश्वर पाटील, ज्योतिराम चव्हाण, भाऊसाहेब आवताडे, नवनाथ आवताडे, भाऊसाहेब चव्हाण, सुभाष इंगोले, संभाजी तानगावडे, संभाजी इंगळे, पंडीत तानगावडे, डॉ सुभाष तानगावडे, अरुण तानगावडे, शिवाजराव नागणे, दिनकर भाकरे, दिगंबर भाकरे, उद्धव भाकरे, अशोक लेंडवे, महादेव चौगुले, सिद्धेश्वर पाटील, बाळ काळुंगे, मोहन कोंडुभैरी, ज्ञानेश्वर काळुंगे, लक्ष्मण मस्के, बाळासाहेब कवाळे, विवेक खिलारे यांचेसह विविध शासकीय विभागातील अधिकारी व पदाधिकारी आणि गावचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा