"गेल्या अनेक वर्षापासून ठाण मांडून बसलेल्या तलाठ्यांच्या तात्काळ बदल्या करा,"- माऊली हळणवर
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
पंढरपूर तहसीलदारांना भाजपाच्या वतीने निवेदन तालुक्यातील अनेक गावातील तलाठी शेतकऱ्यांना सातबारावर नोंद करत असताना त्रास देत असून हेलपाटे मारायला लावत आहेत शासनाने वेळोवेळी जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या नोंदी धरत नाहीत अवाजवी पैशाची मागणी करतात नदीकाठच्या भीमा नदी माणनदी काठावरील गावांमध्ये तर प्रचंड वाळू उपसा होत असून तलाठ्यांच्या संगनमतानेच मुजोर झालेले वाळू चोर महसूल प्रशासनाला व पोलीस प्रशासनाला बदनाम करीत आहेत हे तलाठी गेल्या अनेक वर्षांपासून याच गावांमध्ये कर्तव्यावर आहेत त्यामुळे यांच्यावर कोणाचा आहे दबाव राहिलेला नसून मनमानी पद्धतीने काम करीत आहेत वाळू उपसा मुरूम वाहतूक यातून प्रचंड मलिदा मिळवून गब्बरगन्ड झालेले आहेत काही तलाठी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा घाबरत नाहीत अनेक शेतकऱ्यांना रस्ता केस असेल किंवा इतर कामासंदर्भात सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करतो अशा धमक्याही देत आहेत.
या मुजोर झालेल्या व गेल्या अनेक वर्षापासून दोन्ही नदीकाठी असलेल्या गावातील तलाठ्यांच्या तात्काळ सोलापूर जिल्ह्याच्या बाहेर बदल्या कराव्यात अन्यथा पंढरपूर तहसील कचेरीसमोर भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला यावेळी भाजपा किसान मोर्चाचे माऊली हळणवर ,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संदिप माने ,अनु.जा.तालुका सरचिटणीस तानाजी खिलारे उपाध्यक्ष ,मुकुंद घाडगे , योगेश घाटेराव आदित्य माने ,.चेतन अधटराव.,अक्षय माने यांच्या सह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा