विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान 131 वी जयंती महाउत्सव
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान 131 वी जयंती महा उत्सव समितीच्यावतीने दि.14 एप्रिल 2022 रोजी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे. शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पंढरपूर शहराचे नावलौकिक केल्याबद्दल मान्यवरांचा विशेष सन्मान, पंढरपूर शहरातील पत्रकार संघाचे अध्यक्ष यांचा व कोरोना महामारीमध्ये उल्लेखनीय मदतकार्य केल्याबद्दल कोरोना योध्दांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.नगरसेवक डि.राज. सर्वगोड यांनी दिली.
यावेळी प्रतिष्ठानचे सचिव अनिल ननवरे (सर), जयंती समिती अध्यक्ष सुरेश नवले, भाई नितीन काळे, आण्णा धोत्रे, आदम बागवान, प्रतिक सर्वगोड, तानाजी मोरे, आकाश फडतरे, रूपेश वाघमारे सल्लागार आनंद थोरात, सौ.निशा फुले- देवमारे आदि उपस्थित होते.
प्रतिष्ठानच्यावतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 26 मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहे.1) प्रबुध्द पुरस्कार "विधिज्ञ' 2) महर्षि वाल्मिकी "शौर्यरत्न' पुरस्कार 3) वर्धमान महावीर "अंहिसारत्न' पुरस्कार 4) राष्ट्रसंत रोहिदास महाराज "प्रबोधनरत्न' पुरस्कार 5) छत्रपती शिवाजी महाराज "प्रशासनरत्न' पुरस्कार 6) राजमाता अहिल्यादेवी होळकर "उद्योगरत्न' पुरस्कार 7) महात्मा बसवेश्वर "समाजभुषण' पुरस्कार 8) राष्ट्रपिता महात्मा फुले "समाजरत्न' पुरस्कार 9) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले "शिक्षणभूषण' पुरस्कार 10) राष्ट्रसंत गाडगे महाराज "शिक्षणरत्न' पुरस्कार 11) नारायण मेघाजी लोखंडे "कामगाररत्न' पुरस्कार
12) डॉ.सी.के.बोले "वैद्यकीयरत्न' पुरस्कार 13) राजश्री शाहू महाराज "क्रीडारत्न' पुरस्कार 14) विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर "ज्येष्ठ पत्रकार' पुरस्कार (प्रिंट मिडीया) 15) विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर "ज्येष्ठ पत्रकार' पुरस्कार (इलेक्ट्रॉनिक्स मिडीया) 16) आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर "युवा पत्रकार' पुरस्कार (प्रिंट मिडीया) 17) आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर "युवा पत्रकार' पुरस्कार (इलेक्ट्रॉनिक्स मिडीया) 18) साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे "साहित्यरत्न' पुरस्कार 19) महाकवी वामनदादा कर्डक "कलारत्न' पुरस्कार 20) डॉ.पंजाबराव देशमुख "कृषीरत्न' पुरस्कार 21) भारतरत्न मोक्षगुंडम सर विश्वेश्वरय्या "स्थापत्यरत्न' पुरस्कार 22) भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम "विज्ञानरत्न' पुरस्कार 23) मा.जिजाऊ "आदर्श माता' पुरस्कार 24) माता रमाई "आदर्श पत्नी' पुरस्कार 25) वीर शिवा काशीद "विररत्न' पुरस्कार 26) कर्मवीर भाऊराव पाटील "जीवन गौरव' पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
तरी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांनी आपले प्रस्ताव दि.5 एप्रिल 2022 पर्यंत शिवशंभो मोबाईल शॉपी, जिजामाता शॉपिंग सेंटर शहा पेट्रोल पंपासमोर पंढरपूर जि.सोलापूर संपर्क 9423335100, 9284884529, 9130257429, 9169991414 या पत्त्यावर पाठवावेत व वरील क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.नगरसेवक डि.राज. सर्वगोड यांनी केले आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा