प्रदीप अडसुळे या सर्पमित्र तरुणाला अटक
शिवशाही वृत्तसेवा सांगली
विषारी नागा बरोबर जीवघेणा खेळ करत व्हिडिओ बनवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले असून, त्याच्यावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदवला आहे आहे .
सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बावची येथे राहणारा प्रदीप अडसुळे, हा तरुण सर्पमित्र आहे. तो जेव्हा नाग किंवा साप पकडत असे, तेव्हा विषारी सापांचे व्हिडिओ बनवत असे. नागाच्या फनीचे मुके घेऊन ते व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर अपलोड केले होते. हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला हजारो लाइक्स मिळाल्या होत्या. मात्र हे व्हिडिओ वन विभागाच्या निदर्शनास येताच, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रदीप अडसुळे याच्यावर वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा नोंद करून, त्याला अटक केली आहे.
सांगली वन विभागाचे उपवनसंरक्षक विजय माने, सहाय्यक वनसंरक्षक डॉक्टर अजित साजने, यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सचिन जाधव, सुरेश चरापले, अमोल साठे, वनरक्षक बावची, निवास उगले, आणि भगवान गायकवाड यांच्या पथकाने मंगळवारी ही कारवाई केली.
वन्यजीवांना त्रास होईल किंवा माणसाच्या जिवाला धोका निर्माण होईल, असे कोणतेही स्टंट, वन्य जीवांसोबत करू नये , असे आवाहन वनविभागाने या प्रकरणानंतर केले आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा