श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला आले बेलवनाचे स्वरूप
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
"हरिहरा भेद नाही" असे एक संतवचन आहे. त्यानुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते गेल्या काही वर्षांपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात समितीच्यावतीने सण-उत्सव आणि विशेष दिवसाच्या औचित्याने फळा फुलांची सजावट करण्याची परंपरा सुरू केली आहे.
आज दिनांक १ मार्च रोजी महाशिवरात्र देशभर मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते आहे लोक भगवान शंकराच्या उपासनेमध्ये आणि भक्तीमध्ये लिंग आहेत गावोगावी महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागलेल्या आहेत
महाराष्ट्राची अध्यात्मिक राजधानी समजल्या जाणाऱ्या दक्षिण काशी पंढरी नगरी मध्येही महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. पंढरपुरातील वेगवेगळ्या शिव मंदिरामध्ये महापूजा होत आहे. शिवभक्तांनी दर्शनासाठीही गर्दी केली आहे
दक्षिण काशी पंढरी नगरीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त बेल पत्रांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे महाद्वार सभामंडप तसेच श्री विठ्ठल भगवान आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्याला बेलपत्रांची आणि विविध फुलांची सुंदर सजावट करून शिवगंध रेखाटले आहे. या सजावटीमुळे सावळ्या विठुरायाचे रूप अधिक खुलून दिसत आहे शिवरात्री निमित्त मंदिरात पूजाअर्चा होऊन मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले असून भाविक महाशिवरात्रीनिमित्त महादेवा बरोबरच श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनाचा ही लाभ घेत आहेत
#VitthalRukmini #Pandharpur #temple #Mahashivratri #flowerdecoration
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा