मान्यवरांच्या हस्ते प्रवाशांना पुस्तके व साखर पेढे वाटून मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
दरवर्षी कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण "मराठी भाषा गौरव दिन " म्हणून साजरा करतो. त्याप्रमाणे दि. २७.०२.२०२२ रोजी रा.प. पंढरपूर नवीन बसस्थानकावर सकाळी ठिक ११.०० वाजता प्रा.श्री. धनंजय दिलीप पंधे, अध्यापक विदयालय पंढरपूर व कविवर्य श्री रवि सोनार, प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत तसेच श्री. सचिन कुलकर्णी श्री. भारत शिंदे श्री. राजेंद्र शहापुरकर, श्री. कबिर देवकुळे, इ. पत्रकार व आगार व्यवस्थापक श्री. सुधिर सुतार, स्थानक प्रमुख श्री. रत्नाकर लाड, सकायक कार्यशाळा अधिक्षक श्री. घोलप, वाहतुक निरिक्षक श्री. पंकज तोंडे, सहाय्यक वाहतुक निरिक्षकश्री होनराव, यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे यांनी दिपप्रज्वलन करून कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. प्रास्ताविक भाषणात आगार व्यवस्थापक (व) श्री. सुधिर संदिपान सुतार यांनी मराठी भाषेचे महत्व स्पष्ट करुन मराठी भाषा टिकली पाहीजे, जगली पाहीजे असे स्पष्ट केले. प्रमुख पाहुणे प्रा. धनंजय दिलीप पंधे व कविवर्य श्री. रवि सोनार यांनी कुसमाग्रज यांच्या कवितांचे वाचन केले.
प्रमुख पाहुणे, आगार व्यवस्थापक, स्थानक प्रमुख, सहायक कार्यशाळा अधिक्षक यांनी रा.प. कर्मचारी व प्रवाशी बांधव यांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. रा.प. पंढरपूर आगारामार्फत प्रवाशांना साखर व पेढे वाटप करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते बसस्थानकावरील प्रवाशांना ५१ पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले. रा.प. पंढरपूर आगाराच्या नवीन बसस्थानकावर रा.प. महिला कर्मचारी यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सुशोभित रांगोळी काढली होती. फलाटावर नारळाच्या झावळयाची कमान तयार करण्यात आलेली होती. अशाप्रकारे मोठया उत्साहात रा.प. पंढरपूर नवीन बसस्थानकावर मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वाहतुक नियंत्रक श्री. मोहन शिंदे यांनी केले तर स्थानक प्रमुख श्री. रत्नाकर लाड यांनी आभार व्यक्त केले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा