एकाच वेळी गावातील दोघांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
चळे येथील दोन मित्रांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शुक्रवार दिनांक १८ मार्च रोजी, दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. चळे येथील एका शेतकऱ्याने नवीन पानबुडी मोटर आणली होती. ही मोटर नदीमध्ये सोडण्यासाठी आनंदा शिवाजी मोरे वय 35 आणि राजेंद्र गोविंद सातपुते वय 33 हे दोघे मित्र गेले होते. ती मोटार नदीत सोडत असताना वीज प्रवाह पाण्यात उतरला. त्यामुळे शॉक लागून राजेंद्र आणि आनंदा यांचा जागीच मृत्यू झाला आहे. आनंदा याच्या पश्चात एक मुलगी, एक मुलगा, असा परिवार आहे. तर राजेंद्र अविवाहित होता. एकाच वेळी गावातील दोन तरूण मित्रांचा मृत्यू झाल्याने, गावात शोककळा पसरली आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा