बुलेट आणि कंटेनरचा समोरा समोर भीषण अपघात
शिवशाही वृत्तसेवा, खर्डी
जवळा येथील म्हसोबाच्या दर्शनासाठी गेलेल्या तीन मित्रांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे राहणारे, किरण गुजले, अक्षय पाटील, आणि अजय मंडले, हे तीन जिवलग मित्र आपल्या बुलट क्रमांक एम एच 13 बीटी 4936 या गाडीवरून सांगोला येथील म्हसोबा च्या दर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करून परत येत असताना सोनंद जवळ, समोरून येणाऱ्या कंटेनर, क्रमांक एम एच 46 एक.एफ्. 1086 याची आणि त्यांच्या बुलेटची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला. बाकी दोघांना आसपासच्या लोकांनी दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तपासणी केली आणि त्यांना मदत घोषित केले. किरण गुजले यांचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. त्याच्या पश्चात पत्नी, आई-वडील असा परिवार आहे. तर अजय मंडले आणि अक्षय पाटील यांचेही लग्न ठरले होते. अजय मंडले हा आपल्या आजोळी राहत होता. घरी सर्वसाधारण परिस्थिती असलेल्या तीन जिवलग मित्रांचा, अपघाती मृत्यू झाल्याने खर्डी गावावर शोककळा पसरली आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा