या व्यक्तिने धरला खासदार अमोल कोल्हेंचा कान
शिवशाही वृत्तसेवा शिरूर
चित्रपट अभिनेते आणि शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी, लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान, बैलगाडा शर्यत सुरू करण्याचे, आश्वासन दिले होते. त्याच बरोबर बैलगाडा शर्यत सुरू झाल्यावर, पहिल्या बारी समोर गोडी धरणार, असे वचनही दिले होते. त्यानुसार बैलगाडा शर्यत सुरू झाल्यावर, खासदार अमोल कोल्हे यांनी, बारी समोर धरले. त्यावेळी त्यांनी घोडेस्वारीची कमाल दाखवली होती. दोन्ही हात उभारून, घोड्यावरून रपेट केल्याचा, त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
या कार्यक्रमानंतर, खासदार अमोल कोल्हे, त्यांचे स्नेही शेखर दादा पाचुंदकर, यांच्या घरी गेले होते. तेव्हा शेखर पाचुंदकर यांच्या मातोश्री, लक्ष्मी राजाराम पाचुंदकर यांनी, खासदार अमोल कोल्हे यांना, औक्षण करून त्यांची दृष्ट काढली.
आणि मातोश्री लक्ष्मी पाटणकर यांनी, खासदार अमोल कोल्हे यांना, मायेने दटावले, "असले धाडस पुन्हा करू नको. पुन्हा असं घोड्यावर बसायचं नाही" असा दम भरला. मित्राच्या आईने मायेने दिली तंबी, खासदार अमोल कोल्हे यांनी, हात जोडून नम्रतेने स्वीकारली आहे. आणि हा व्हिडीओ फेसबुक वर पोस्ट करून, "माता माऊली अशी काळजी घेतात, तेव्हा आणखी बळ मिळते," असे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा