maharashtra day, workers day, shivshahi news,

आमदार समाधान आवताडे व मा.आमदार प्रशांत परिचारक यांची आरोग्य व कृषी विभागाची आढावा बैठक संपन्न - शिवशाही न्यूज

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय याचा विस्तार करण्यासाठी प्रस्ताव

MLA, samadhan autade, prashant paricharak, civil hospital, Pandharpur, shivshahi news,

पंढरपूर येथे अस्थित्वात असणाऱ्या १०० खाटाच्या उपजिल्हा रुग्णालयाचे सामान्य रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याचा प्रस्ताव त्वरित मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार

शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर

मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये आरोग्य व कृषी विषयक असणाऱ्या विविध समस्या व आवश्यक सोयी - सुविधा अनुषंगाने आढावा घेणारी बैठक आमदार मा. समाधानदादा आवताडे व आमदार मा. प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे संपन्न झाली.यावेळी जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी,उपजिल्हा रुग्णालय, आरोग्य विषयीचे सर्व अधिकारी आणि कृषी विभागाचे सर्व अधिकारी बैठकीस उपस्थित होते. 

          पंढरपूर येथे अस्थित्वात असणाऱ्या १०० खाटाच्या उपजिल्हा रुग्णालयाचे सामान्य रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याचा प्रस्तावास ०१/०६/२०१४ रोजी मंजुरी मिळाली असताना अद्याप पर्यत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने आ.समाधान दादा आवताडे व आ.प्रशांत परिचारक यांनी नाराजी व्यक्त केली. या रुग्णालयाचा प्रस्ताव प्रलंबित असल्याने आरोग्य मंत्री महाराष्ट्र शासन यांच्याकडे तातडीने बैठक आयोजित करण्याचे ठरवले

         दोन्ही तालुक्यातील रुग्णालयाची माहीती घेऊन स्टाफ ची आवश्यकता वेळोवेळी लागणारी नवीन साधनसामुग्री वेळेवर आणि आवश्यक प्रमाणात न मिळणार औषध साठा याविषयी सखोल चर्चा झाली.या वर मार्ग काढण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. यामद्ये पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील सर्व उपआरोग्य केंद व त्याठिकाणी नसणाऱ्या सुविधा व सुख सोयी आणि औषधासाठी पूर्तता करण्याविषयीच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.आरोग्यविषयक जे अपूर्ण प्रस्ताव आहेत. ते लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावेत. रांझणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम बरेच दिवसापासून रखडले असून कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांना भ्रमण ध्वनी वरून आजच्या आज स्थळ पाहणी करण्याच्या सुचना दिल्या.तसेच केंद्र शासनाकडे आरोग्य विभागाच्या नवीन बांधकाम विषयी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले.

         त्याचबरोबर डाळींब या पिकाच्या मर रोगामुळे (शॉट होल बोरर) हातातोंडाला आलेले फळ उधवस्त होत चालले आहेत. नवीन उपाययोजना व ज्या शेतकऱ्याची बाग पूर्ण पणे उधवस्त झाली आहे. त्यासाठी आवश्यक ते पंचनामे करून शासनाकडून अनुदान या विषयावर या अधिकाऱ्यां सोबत चर्चा करून मा.मुख्यमंत्री महोदय यांच्या कडे मागणी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे मत व्यक्त केले.

     यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्हा प.स.वसंतनाना देशमुख, जि. प.स.तानाजी वाघमोडे,कृषी उत्त्पन्न बाजार समिती, मंगळवेढा चे सभापती मा. सोमनाथ आवताडे, पं. स.सदस्य प्रशांत देशमुख,पं.स. माजी सभापती मा. प्रदीप खांडेकर,येताळ भगत सर,मि. सभापती मासाळ,पं. स.स.धनाजी पाटील आदी मान्यवर, जिल्हा आरोग्य अधिकारी शितल जाधव,जिल्हा शैल्य चिकित्सक ढेले,गट विकास अधिकारी, प्रशांत काळे,नगरपालिका चे मुख्याधिकारी माळी साहेब,सुनील वाळूजकर, दही तालुका आरोग्य अधिकारी एकनाथ बोधले, डॉ. गिराम,पंढरपूर कृषी विभाग राजेंद्र पवार,मंगळवेढा गट विकास अधिकारी चव्हाण मॅडम, मोहन अप्पा बागल, तुकाराम कुरे,संभाजी पाटील,अमीन शेख,पदाधिकारी उपस्थित होते.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !