जेष्ठ सिने नाट्य अभिनेते रमेश देव (ramesh deo) यांचं वयाच्या ९३ व्या वर्षी हृदय विकाराचा झटक्याने निधन झाले आहे. परवाच ३० जानेवारी रोजी त्यांचा ९३ वा वाढदिवस साजरा केला होता. ८० च्या दशकात त्यांनी चित्रपट सृष्टीवर राज्य केले आहे. अतिशय देखणे रूप आणि नैसर्गिक अभिनयाच्या जोरावर त्यांनी आपला एक चाहता वर्ग निर्माण केला होता. मराठी आणि हिंदी चित्रपटात (hindi cinema) त्यांनी नायक , खलनायक अश्या दोन्ही प्रकारच्या भूमिका केल्या आहेत आणि त्या दोन्ही प्रकारच्या भूमिकेत त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. हिंदीतील अमिताभ बच्चन (amitabh bacchan ) , राजेश खन्ना (rajesh khanna ) पासून मराठीतील निळू फुले (nilu fule) सचिन पिळगावकर, (sachin pilgavkar) अशोक सराफ( ashok saraf) पर्यंत हिंदी मराठीतील जवळपास सर्वच कलाकारांबरोबर रुपेरी पडदा ( silver screen) शेअर केला आहे.
अतिशय निर्व्यसनी जीवन जगणारे अभिनेते रमेश देव यांनी चित्रपटात यशाचे शिखर गाठले असतानाही नाटकाशी असलेली नाळ तुटू दिली नाही. त्यांचे अनेक मराठी हिंदी चित्रपट ( marathi movie ) आणि नाटकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करत मोठं यश मिळवले आहे. त्यांच्या सहकलाकार असलेल्या सीमा ( seema deo ) यांच्याशी त्यांचा विवाह झाला. मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात यशस्वी जोडपे अशी त्यांची ओळख होती. रमेश देव आणि सीमा देव या जोडीने अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
आज धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये ( dhirubhai ambani hospital ) त्यांचे निधन झाले. हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते . उपचारादरम्यान त्यांचे सायंकाळी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी सीमा, मुलं अभिनेता अजिंक्य देव ( ajinky deo ) आणि अभिनय देव सुना नातवंडे असा परिवार आहे. जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले, ( vikram gokhale ) शरद पोंक्षे, ( sharad ponkhe ) अशोक सराफ, अलका कुबल ( alaka kubal ) आणि अन्य चित्रपट क्षेत्रातील कलाकारांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या निधनाची बातमी समजताच भारतीय चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
सचिन कुलकर्णी
संपादक शिवशाही न्यूज नेटवर्क
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा