maharashtra day, workers day, shivshahi news,

शेतकरी, कष्टकरी, महिला व कामगारांच्या प्रश्नावर कॉंग्रेस आक्रमक

पंढरपुरात आमसभा घेण्याची आग्रही मागणी-राहुल पाटील

Indian National Congress, Pandharpur, demand, aam sabha, deputy collector, tahsildar, BDO, Panchayat samiti Pandharpur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर

शेतकऱ्यांची खत दुकानदारांकडून होणारी लूट, महावितरण कंपनीकडून डीपी व लाईट बीलबाबत होत असलेला अन्याय, महापुर नुकसान भरपाई, पीकविम्याची रक्कम देताना होणारी टाळाटाळ, रेशन दुकानातून सर्वसामान्यांना धान्य देताना होणारा दुजाभाव, पाणी प्रश्न, महिलांची बचत गट व मिनी फायनान्सच्या नावाखाली होणारी आर्थिक पिळवणूक, कामगारांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ मिळत नसल्याने त्यापासून ते वंचित राहत आहेत याला वाचा फोडण्यासाठी पंढरपूर तालुका कॉंग्रेस आक्रमक बनली असून वरील प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पंढरपूूरची आमसभा आयोजित करण्यात यावी अशी आग्रही मागणी पंढरपूरचे प्रांताधिकारी, तहसिलदार व  पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे पंढरपूर तालुका कॉंग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष राहुल कौलगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. 

यावेळी कॉंग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किशोर जाधव, माजी शहराध्यक्ष सुहास भाळवणकर,   माजी शहर कार्याध्यक्ष राजू उराडे, युवक शहर कार्याध्यक्ष सागर कदम, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अश्पाक सय्यद, यंग ब्रिगेड सेवा दल तालुकाध्यक्ष समाधान रोकडे, ओबीसी माजी शहराध्यक्ष मधुकर फलटणकर, देवानंद इरकल, मिलिंद अढवळकर, शशिकांत चंदनशिवे यांच्यासह कॉंग्रेसचे विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पंढरपूर तालुका हा राजकीयदृष्ट्‌या महत्वाचा आहे. कारण पंढरपूर, माढा, सांगोला, मोहोळ या 4 विधानसभा मतदारसंघात व सोलापूर व माढा या 2 लोकसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्याचा समावेश आहे. तसेच विधानपरिषदेचे 3 आमदार असूनसुध्दा म्हणावा तसा पंढरपूर तालुक्याचा विकास  झाला नाही किंवा प्रलंबित प्रश्न सुटलेले नाहीत. 

अनेक दिवसांपासून समस्यांच्या विळख्यात अडकलेला तालुका म्हणून काही दिवसांपासून तालुक्याची नवी ओळख निर्माण होत आहे. कारण मागील 4 वर्षात एकही आमसभा घेण्यात आलेली नाही त्यामुळे प्रलंबित प्रश्न सोडविणे राहिले बाजूलाच उलट आणखी नवीन प्रश्न निर्माण होत आहे याचा विचार करून लवकरात लवकर पंढरपुरात आमसभा आयोजित करण्यात यावी अशी आग्रही मागणी पंढरपूर तालुका कॉंग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष राहुल कौलगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मागणी करण्यात आली.


डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर कॉंग्रेसला मिळाली ऊर्जा

गेल्या काही वर्षांपासून पंढरपूर विभागातील कॉंगे्रसला मरगळ आलेली होती. काही अपवाद वगळता मोठे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी कॉंग्रेसचे पदाधिकारी आक्रमक भूमिका घेत नव्हते मात्र सोलापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष पद डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे आल्यापासून पंढरपूर कॉंग्रेसला नवीन ऊर्जा मिळत असून पदाधिकारी नव्या जोमाने प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी कॉंग्रेस आक्रमक पवित्रा घेत असल्याचे दिसून येते.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !