जगभरातील संगीत रसिक शोकसागरात
शिवशाही वृत्तसेवा मुंबई
भारताची गानकोकिळा गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर ( bharatratna lata mangeshkar ) यांचे निधन झाले आहे. ब्रीच कॅण्डी रुग्णालयात गेल्या 28 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र 93 वर्षाच्या लतादीदी यांनी आज अखेरचा श्वास घेतला. सकाळी साडेनऊ वाजता ब्रीच कँडी रुग्णालयातून ही माहिती देण्यात आली आहे. काल रात्रीपासूनच त्यांची तब्येत खालावली असल्याच्या बातम्या येत होत्या. सकाळी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ( nitin gadkari ), खासदार संजय राऊत ( sanjay raut ), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM uddhav thakaray ) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे ( rashmi thakare ), यांच्यासह अनेक मंडळींनी रुग्णालयात रिघ लावली होती. त्याचबरोबर कला क्षेत्रातील मंडळी आणि चाहत्यांनीही रुग्णालय परिसरात जमायला सुरुवात केली होती. आज सकाळी साडेनऊ वाजता त्यांच्या निधनाची अधिकृत बातमी समोर आली. त्यांनी अनेक वर्षे आपल्या सुरेल आवाजाने त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. हा स्वर्गीय सूर आता शांत झाला असून. कला, संगीत व भारताच्या सांस्कृतिक क्षेत्रात, मोठी पोकळी निर्माण करून लतादीदींनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांचे पार्थिव प्रभू कुंज येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, संध्याकाळी साडेसहा वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा