रेल्वेच्या डब्यात खिडकीतून हात घालून दोन लाख ऐंशी हजार रुपयांची चोरी
शिवशाही वृत्तसेवा कुर्डूवाडी
रेल्वेचा वेग कमी झाल्यानंतर दोन वेगवेगळ्या बोगीच्या खिडकीतून हात घालून अज्ञात चोरट्याने सोन्याची चेन पळवून नेली. यामध्ये चोरट्याने २ लाख ८० हजारांचा ऐवज लुटून नेला. ही घटना गुरुवार, दि. १० रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ढवळस (ता. माढा) येथील रेल्वेस्थानकाच्या आऊटर सिग्नलजवळ घडली.
या बाबतीत शिल्पा कमल मोदी (रा. देवी वार्ड, काळा मारुती मंदिर, ता. पुसद, जि. यवतमाळ) व अक्षय अनंत मोरे (रा. १३८ प्रथम बंगलो सोसायटी, पोलिसलाईन वाकड, पुणे) यांनी कुर्डुवाडी लोहमार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
अधिक माहितीनुसार फिर्यादी या पनवेल नांदेड गाडी क्र. १७६१३ गाडीने प्रवास करत होते. गळ्यातील सोन्याचे चेनमधील पडलसह २ लाख ५० हजार रुपयांची सोन्याची चेन अज्ञात चोरून ओढून पळवून नेली. याच गाडीतील अक्षय मोरे हे एका बोगीतून प्रवास करत असताना एका चोरट्याने वायफाय डिव्हाइस (२००० रु), ॲपल इअर बँड (१२ हजार ५००), आदी असे एकूण ३३ हजार ९०० रुपयांचा ऐवज लंपास केला. दोन वेगवेगळ्या घटनेत सोन्याच्या चेन व इतर वस्तू असा एकूण २ लाख ८३ हजार ९०० रुपयांचा ऐवज लंपास
या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधिक्षक लोहमार्ग पुणे गणेश शिंदे, उपविधागीय पोलिस अधिकारी लोहमार्ग प्रवीण चौगुले, कुर्डुवाडी लोहमार्ग पोलिस ठाणे प्रभारी पालवी काळे, पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल वाघमारे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सपोनि अंतरकर, हवालदार कदम, पो.ना. कांबळे व पी.एन भोसले, कुर्डुवाडी तपास शाखेचे हवालदार संजय सरोदे व पो. ना गणेश जगताप यांच्या पथकाने घटना स्थळाला भेट देऊन पाहणी केली. अधिक तपाससाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा