आगामी निवडणुकीत भगीरथ दादा भालके यांचा सक्रिय सहभाग असेल ?
पंढरपूर राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके हे मध्यंतरी मतदार संघात सक्रिय झाले आणि अल्प काळासाठी दर्शन देवून पुन्हा दिसेनासे झाल्याने, भालके समर्थकांमध्ये नैराश्याची लाट पसरली आहे. पंढरपूर मंगळवेढा, मतदार संघाच्या पोट निवडणुकीनंतर गेल्या आठ महिन्यात भगीरथ भालके हे सातत्याने नॉट रिचेबल आहेत. विठ्ठल सहकारी कारखान्याचा गुंता सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून आणि कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येते.
दरम्यान स्वर्गीय आमदार भारत मालक यांच्या स्मृतीदिनी भगिरथ दादांनी छोटेखानीच पण भावनिक भाषण केले होते. या भाषणात त्यांनी, "मी नानांचा बछडा आहे. मैदान सोडून पळणार नाही." असे आत्मविश्वासाने सांगितले. त्यानंतर पुन्हा दुध संघाच्या निवडणुकीसंदर्भात रणनीति ठरवण्यासाठी त्यांनी बैठकीला हजेरी लावली होती. त्यामुळे भगीरथ दादा मोठ्या गॅपनंतर राजकारणात सक्रिय झाल्याने कार्यकर्त्यामध्ये चैतन्य संचारले होते.
मात्र त्या एका अल्पशा दर्शनानंतर भगीरथ दादा पुन्हा नॉट रिचेबल झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांची घोर निराशा झाली असून, नुकतेच संजय मामा शिद याच्या फार्महाऊसवर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत दादा दिसून आले होते.
आता लवकरच पंढरपूर नगरपरिषद, मंगळवेढा नगरपरिषद , पंचायत समिती, जिल्हा परिषद इ. निवडणुका लागतील. भालके गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने आणि निष्ठेने त्या निवडणुकीत काम करतील यात शंका नाही. परंतू नेतृत्व म्हणून यावेळी तरी दादा पूर्ण क्षमतेने राजकारणात उतरतील, का पुन्हा दिसेनासे होतील ? हे येणारा काळच ठरवेल.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा