एकाच रात्री एकाच गावात अनेक घरफोड्या आणि चोऱ्या करण्याचे प्रमाण वाढले
पंढरपूर तालुक्यातही अशाच घटना घडल्या आहेत
शिवशाही वृत्तसेवा सांगोला
शिरभावी येथे मेडिकल ॲग्रो मार्ट, हॉटेल, घर अशा पाच •ठिकाणी रोख रक्कम व सोन्याचे दागिने अशी ३७ हजारांची चोरी झाली आहे. याचा गुन्हा सांगोला पोलिस ठाण्यांत दाखल झाला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरुवार, १० फेब्रुवारी रोजी रात्री व शुक्रवार, ११ फेब्रुवारीच्या पहाटेपर्यंत शिरभावी, ता. सांगोला येथील फिर्यादी समाधान मच्छिंद्र साळुंखे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून लोखंडी कपाटातील सोन्याचे बदाम व अंगठी तसेच टीव्ही अशी वीस हजार रुपयांची चोरी झाली आहे. तसेचआतिश काळे यांच्या सद्गुरू ॲग्रो मार्ट दुकानाचे कुलूप तोडून ड्रॉवरमधील एक हजार पाचशे रुपयांची चोरी झाली आहे. सिद्धीविनायक मेडिकलमधील पाच हजार पाचशे रुपयांची चोरी झाली आहे. संतोष बंडगर यांच्या हॉटेलमधून दहा हजार रुपये किमतीच्या एलईडी टीव्हीची चोरी झाली आहे. संतोष कांबळे यांच्या घरातील वस्तूंचीही चोरी झाली आहे. अशी पाच ठिकाणी चोरी होऊन ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याबद्दल सांगोला पोलिस ठाण्यांत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा