संजय लीला भन्साळी यांच्या गंगुबाई काठीयावाडी या चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाने चालवली कात्री
शिवशाही वृत्तसेवा मुंबई
चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी ( sanjay leela bhansali ) यांचे चित्रपट नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडत असतात, आणि त्यांच्या चित्रपटातील काही दृश्ये कापूनच चित्रपट प्रदर्शित होत असतो. आता संजय लीला भन्साळी हे कामाठीपुरातील गंगुबाई काठियावाडी ( gangubai kathiyawadi ) यांचा जीवनपट ( biopic ) त्यांच्या चित्रपटातून मांडत आहेत.
गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्याला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुख्य भूमिकेत आलिया भट ( aliya bhatt ) हिच्या कामाचे सुद्धा लोक कौतुक करत आहेत. मात्र या चित्रपटातील एका दृश्यावर सेन्सॉर बोर्डाने ( Censor Board ) कात्री चालवली आहे
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ( pt. Jawaharlal Nehru ) गंगुबाई काठियावाडीला गुलाबाचे फूल देतात, असे हे दृश्य होते. कामाठीपुऱ्यात ( kamathipura ) वेश्याव्यवसाय करणारी गंगुबाई काठियावाडी या कोठेवाली ने स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे कामाठीपुऱ्यातील गुंडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली होती. तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गंगुबाई काठियावाडी यांना भेटण्याची वेळ दिली होती. या भेटीनंतर पंडित नेहरूंनी गंगुबाई काठियावाडीला गुलाबाचे फुल दिले.
ते दृश्य संजय लीला भन्साळी यांनी आपल्या खास शैली मध्ये दाखवले होते. मात्र यावर काही वाद होण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने हे दृश्य कापल्याने भविष्यात वाद होण्याची शक्यता नसली तरी, गंगुबाईच्या वारसांनी या चित्रपटात गंगुबाई काठियावाडी यांचे चुकीची चित्रण केल्याचा आरोप संजय लीला भन्साळी यांच्यावर केला होता.
आलिया भट,अजय देवगण ( ajaay devgan ) आणि विजयराज (vijayraj ) यांच्या मुख्य भूमिका असलेला संजय लीला भन्साळीचा गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. त्या पूर्वी बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ( Berlin International Film Festival) या चित्रपटाचा प्रिमियर होणार आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा