शिवजयंती शांततेत पार पाडण्यासाठी पंढरपूर तालुका पोलीस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त
शिवशाही वृत्तसेवा खर्डी
खर्डी तालुका पंढरपूर येथील पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन तर्फे शिवजयंतीनिमित्त खर्डी कासेगांव, अनवली, गोपाळपूर, सिद्धेवाडी, टाकळी गावांमध्ये पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. शिवजयंती उत्सव शांततेत कायदा व नियमाचे पालन करून पार पडावा. यासाठी पोलीस प्रशासन प्रत्येक वर्षी तालुक्यातील महत्त्वाच्या गावात आदल्यादिवशी रूट मार्च काढला जातो. यावेळी 4 अधिकरी 25 पोलीस अंमलदार 25 होमगार्ड यांच्यासह पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील सहा.पोलीस.निरीक्षक शंकर वलेकर, पो.उपनिरीक्षक गोदे , वसमळे, गोपनीय विभागाचे गजानन माळी यांच्यासह हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल, पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी मोठ्या उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा