छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पंढरपूर उपनगरात उत्साहात साजरी
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पंढरपूर शहरातील उपनगरातील येळे वस्ती परिसरात सौ.सिमाताई परिचारक संचलित राजयोगिनी अहिल्यादेवी होळकर महिला चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा माजी नगरसेविका श्रीमती कमलताई तोंडे यांच्यावतीने उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पुजन रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष इंजिनिअर असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद वाघ यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच यावेळी दिपप्रज्वलन माजी नगरसेवक विवेक परदेशी यांच्याहस्ते तर समाजसेवक तम्माशेठ घोडके यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या कार्यक्रमास सा.धन्यवादचे संपादक शंकरराव कदम व पत्रकार विक्रमराजे कदम यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
यावेळी पाहुण्यांचा सत्कार दिपक येळे मेंबर यांच्याहस्ते करण्यात आला. सदर कार्यक्रमास ज्ञानेश्वर तारे, निरंजन पवार, अर्जुन वाळूजकर, सुनिल चव्हाण, रवि येळे, रवि गलगलकर, कांतीलाल वरपे, दिगंबर स्वामी आदि उपस्थित होते.
यावेळी मिलिंद वाघ, विवेक परदेशी यांनी विचार व्यक्त केले. तर तम्माशेठ घोडके शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश देसाई, युवराज सलगर, शितल येळे, प्रमोद राजहंस, मिलिंद येळे, अशोक घोडके यांच्यासह आदिंनी परिश्रम घेतले. सदरच्या कार्यक्रमाचे नेटके नियोजन पंकज तोंडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुभाष येळे यांनी मानले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा