शिक्षक आमदार श्री. दत्तात्रय सावंत सर व इतर पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून दिल्या शुभेच्छा
शिवशाही वृत्तसेवा मंगळवेढा (राज सारावडे)
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ संचलित राष्ट्रीय विश्वगामी माध्यमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम साहेब यांच्या आदेशानुसार पंढरपूर येथे नूतन मराठी माध्यमिक विद्यालय मंगळवेढा येथील आदर्श व कर्तव्यदक्ष सहशिक्षक श्री. सुभाष कांतीलाल गायकवाड यांची राष्ट्रीय विश्वगामी माध्यमिक शिक्षक संघाच्या मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब आडसूळ महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे मंगळवेढा तालुका प्रमुख श्री. राजेंद्र माळी सर, शरद पवार विद्यालयाचे श्री. सचिन कोरे सर, राज्य सल्लागार करे सर डॉ. प्राध्यापक काळे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब शिंदे, संपर्कप्रमुख गाडेकर सर, पंढरपूर तालुका अध्यक्ष संजय मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या निवडीबद्दल पुणे विभागाचे शिक्षक आमदार श्री. दत्तात्रय सावंत सर, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन श्री. माननीय सिद्धेश्वर आवताडे व महाराष्ट्र राज्य कृती समितीचे मंगळवेढा तालुका प्रमुख श्री. राजेंद्र माळी सर व इतर पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा