प्रजासत्ताक दिनानिमित्त महारुद्र गारमेंट्सचे हेमंत कुलकर्णी यांचा उपक्रम
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
पंढरपूर शहर व परिसरातील सायकल चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी महारुद्र गारमेंट्सच्या वतीने सायकलिस्टचा सन्मान सोहळा माननीय युवानेते प्रणव परिचारक यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला 26 जानेवारीच्या मुहूर्तावर 15 ऑगस्ट 2021 ला ज्या सायकलिस्टनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांना व सीमेवर आपले रक्षण करणाऱ्या सैनिकांना मानवंदना देण्यासाठी त्या एका दिवसात 75 किलोमीटर सायकलिंग केले अशा सर्व सायकलिस्टचा सन्मान महारुद्र गारमेंटच्या वतीने काल करण्यात आला.अशा सर्व 24 सायकलिस्टना सायकलिंग टी-शर्ट व गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी युवा नेते माननीय प्रणव परिचारक द.ह. कवठेकर प्रशालाचे मुख्याध्यापक श्री.पाटील सर, सामाजिक कार्यकर्ते केशवकाका कुलकर्णी, मा. नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर, विवेक परदेशी, सचिन कुलकर्णी, महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक गणेश अंकुशराव, सामाजिक कार्यकर्ते श्याम गोगाव, शहाजी देशमुख सर, गुंतवणूक सल्लागार मयूर परिचारक, नामदेव देशमुख सर , विकास सोसायटीचे चेअरमन वामन कदम व जगन्नाथ माने, ग्रा. प. सदस्य श्री अशोक काका शेडगे व महारुद्र गारमेंटच्या मालक सौ. मेघा कुलकर्णी व श्री हेमंत कुलकर्णी यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात खालील सायकलिस्टचा सन्मान करण्यात आला श्रीयुत प्रकाश शेटे, डॉ दीक्षित, राजदीप मोहन पाटील , संतोष कवडे, तुकाराम खंदाडे, चिन्मय राहुल बडवे, कैवल्य मिलिंद गाताडे, धनंजय जोगदेव, मुकेश लखेरी, यश कुलकर्णी, शुभम लिगाडे, आकाश लिगाडे, सुजित राजेंद्र दिवाण, वेदांत कुलकर्णी, विठ्ठल पाटील, प्रशांत मोरे, संतोष पाटोळे , सुनील क्षीरसागर, गणेश बुद्याळ, किशोर डिघोळे, सचिन राऊत ,प्रेम भोसले , सतिशकुमार चंद्रराव , प्रकाश परदेशी
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश देशपांडे, सचिन गिड्डे, अनिरुद्ध कुलकर्णी, आकाश वाघमारे व सर्व महिला कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा