लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील खळबळजनक घटना
शिवशाही वृत्तसेवा लातूर
लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील क्रीडा शिक्षकाने स्वत:लाच श्रद्धांजली वाहून आपली जीवनयात्रा संपवली आहे. सचिन शिवराज अंबुलगे असे या शिक्षकाचे नाव आहे. देवणी येथील रहिवासी असलेले अंबुलगे ते चाकूर येथील जिल्हा परिषद शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून काम करत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीपर्यंत खेळात यश मिळवले आहे.
सचिन अंबुलगे ते चाकूर येथे आदर्श कॉलेज भाड्याने राहत होते. गुरुवारी रात्री त्यांनी गळफास लावून स्वताला संपवले. गेल्या काही दिवसांपासून ते तणावात होते. मी जगण्याला कंटाळलो आहे मी आत्महत्या करणार आहे अशा अर्थाचे स्टेटस व्हाट्सअप वर ठेवत असत. तसेच काही ग्रुपवर तसेच मेसेज फॉरवर्ड करत असत. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी व्हाट्सअप वर स्वतःचा फोटो शेअर करून स्वतःलाच श्रद्धांजली वाहिली होती. आणि गुरुवारी रात्री त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे
सचिन अंबुलगे यांचा भाऊ रवींद्र अंबुलगे (रा. देवणी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाकुर पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सचिन अंबुलगे यांचे चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून देवणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी चाकुर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बालाजीराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार शिवाजी गुंडरे अधिक तपास करीत आहेत
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा