शिवशाही विशेष
महात्मा गांधींची (mahatma gandhi) हत्या करणारा नथुराम गोडसे (nathuram godse) यांची भूमिका केल्याने राष्ट्रवादीचे (NCP) खासदार वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati sambhaji Maharaj) यांच्या भूमिका केल्याने अमोल कोल्हे (Amol kolhe) यांची तुफान प्रसिद्ध झाली होती. त्याच प्रसिद्धीच्या जोरावर ते खासदार म्हणून निवडून आले. मात्र आता व्हाय आय किल्ड गांधी (why I killed Gandhi) या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. आणि त्यात नथुराम गोडसेच्या भुमिकेत खासदार अमोल कोल्हे दिसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देताना " हा चित्रपट मी 2017 मध्ये स्वीकारला होता, तसेच एक कलाकार म्हणून मला ही भूमिका आव्हानात्मक वाटली. मात्र मी कोणत्याही हत्येचे समर्थन करत नाही. माझी कला आणि खाजगी आयुष्य यांची गल्लत करू नका." असे त्यांनी म्हटले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत खासदार अमोल कोल्हे यांच्या या भूमिकेमुळे दोन मतप्रवाह तयार झाले आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे ( यांनी कलाकार म्हणून आनंद कोल्हे यांची पाठराखण केली आहे. तर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आली नाही. हा चित्रपट ३० जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा