कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मान
शिवशाही वृत्तसेवा सोलापूर
सोलापूर जवळील शिंगडगावकर येथील एस एस कलशेट्टी प्रतिष्ठानच्यावतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांना मंगलमलाय गुणवंत पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. प्रशांत माळवदे हे पत्रकार सुरक्षा समितीचे पंढरपूर तालुका अध्यक्ष आहेत तसेच तेज न्यूजचे संपादक आहेत
यावेळी गौरव प्रमाणपत्र, ब्लूटूथ,शाल, श्रीफळ, हार व दिवाळी अंक भेट देऊन पत्रकारांना सन्मानित केले होते. माळवदे यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या निष्ठा पूर्वक कामाची, कार्याची आम्ही दखल घेत आहोत .या आपल्या विधायकतेतून समाज आणि राष्ट्राची मोठी प्रगती होणार आहे. यावर आमचा विश्वास आहे . कोविड -19 च्या काळात आपण केलेले कार्य उल्लेखनीय आहे. म्हणूनच आपणास सुमंगलाय गुणवंत पत्रकार पुरस्कार सन्मान देताना मनस्वी आनंद होत आहे तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कार्य करत असताना भविष्यात समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी वस्तुनिष्ठ ,दृष्टिकोन समोर ठेवून आपल्या हातून समाजसेवेचे उत्तुंग कार्य घडो हीच सदिच्छा असे मत अध्यक्ष प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केले.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध मान्यवरांच्या कडून माळवदे यांचे कौतुक करुन अभिनंदन केले जात आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा