maharashtra day, workers day, shivshahi news,

वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पत्रकारितेचा उपयोग करावा - विश्वासराव आरोटे राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या करकंब विभागीय कार्यालयाचे उद्घाटन 

maharashtra rajya marathi patrakar sangh, pandharpur, karkamb office , shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा करकंब

करकंब तालुका पंढरपूर येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या करकंब विभागीय कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी म .रा .म पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पत्रकारिता कशा प्रकारची असावी पत्रकारिता करत असताना समाजातील आर्थिक सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पत्रकारितेचा उपयोग करावा असे सांगितले या वेळी त्यांनी करकंबच्या लेकी चे झाड या अभियानाचे कौतुक केले हा उपक्रम राज्यभर राबवण्याचा साठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

या वेळी विविध मान्यवरांनी पत्रकारिते विषयी आपले मनोगत व्यक्त करताना पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याच्या भावना व्यक्त केल्या याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव पश्चिम महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र कोरके पाटील, पंढरपूर विभागीय अध्यक्ष प्रवीण नागणे, पत्रकार नागेश आदापुरे, कुमार कोरे, सचिन कुलकर्णी, संजय ननवरे, राजेश बादले पाटील, सूर्याजी भोसले, आबा तावसकर, संतोष रणदिवे, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक महेश मुंडे, सरपंच तेजमला पांढरे, उपसरपंच आदिनाथ देशमुख, ग्रामपंचायत सदस्य राहुल पुरवत, संतोष धोत्रे, बापू शिंदे, नागनाथ गायकवाड, प्राचार्य हेमंत कदम, करकंब गावच्या लेकीचे झाड या अभियानाचे ज्ञानेश्वर दुधाने व त्यांची टीम, इतर मान्यवर उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या करकंब विभागाचे अध्यक्ष मनोज पवार, उपाध्यक्ष गोपीनाथ देशमुख, पत्रकार राजेंद्र करपे, अतुल अभंगराव, लक्ष्मण शिंदे, विश्वनाथ केमकर, नितीन खाडे, ऋषिकेश वाघमारे,  गणेश माने, सिद्धेश्वर वाघमारे, सुरज व्यवहारे, रोहन नरसाळे, रुपेश सदावर्ते, इत्यादींनी परिश्रम घेतले.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !