प्रगती ठरली इंस्पायर अवॉर्ड मानांकन मिळवणारी पहिली विद्यार्थिनी - होत आहे शुभेच्छांचा वर्षाव
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयाची विद्यार्थीनी कु. प्रगती मोहन काळे हिची इंस्पायर अवॉर्ड मानांकनाच्या राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. त्याबद्दल तिचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.
डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी भारत सरकार मार्फत प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना इंस्पायर अवॉर्ड दिली जातात. शेक्षणिक वर्ष 2020 -2021 साठीची अवॉर्ड प्राप्त विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय प्रदर्शन online घेण्यात आले होते. यातून राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्याची यादी नुकतीच जाहीर झाली. त्यामध्ये कु . प्रगती काळे हिची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. तिने जिल्हास्तरावर अँटोमॅटीक एनर्जी सेव्हर हा प्रकल्प सादर केला होता. त्यासाठी तिला विषय शिक्षक चंद्रकांत मलपे, भारत व्यवहारे, पुणे येथील सॉप्टवेअर इंजिनियर प्रशांत शिंदे , प्राजक्ता गवळी -शिंदे व साहिल काळे यांचे मार्गदर्शन लाभले. सोलापूर जिल्ह्यातून एकूण 7 मुलांची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. त्यापैकी 2 मुले ही रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतील आहेत. या प्रशालेत इंस्पायर अवॉर्ड मानांकनाच्या राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झालेली कु. प्रगती काळे ही पहिली विद्यार्थीनी ठरली आहे. यासाठी तिचे रयत शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. अनिल पाटील, विभागीय अध्यक्ष संजीव पाटील, सचिव महादेव शिवणकर, सहसचिव संजय नागपुरे, इन्स्पेक्टर राजेंद्र साळुंखे, सहाय्यक इन्स्पेक्टर सुरेशकुमार गोडसे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बाळासाहेब पाटील, वाशीम जिल्ह्याचे भूमिअधिक्षक शिवाजी भोसले, मुख्याध्यापक बिभीषण पाटील, पर्यवेक्षक चंद्रकांत पाटील व शिक्षक स्टाफने अभिनंदन केले.
आमच्या प्रशालेतील दोन ते तीन विद्यार्थ्यांची प्रत्येक वर्षी जिल्हास्तरीय इंस्पायर अवॉर्डसाठी निवड होते . यावेळी मात्र पहिल्यांदाच कु . प्रगती काळे हिची राज्य पातळीवर निवड झाली . त्यामुळे आम्हाला फार आनंद झाला आहे .
बिभीषन पाटील
मुख्याध्यापक,
श्री . शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालय,
रोपळे बु॥ . ता . पंढरपूर , जि . सोलापूर
.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा