रोपळे येथील श्री शिवाजीभाऊ पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन व सन्मान सोहळा
स्नेहमेळावा साठी उपस्थित शिक्षक यांचेसह माजी विद्यार्थी |
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
शाळेतील माजी विद्यार्थी आपले जीवनामध्ये यशस्वी होत असताना त्यांच्या त्या यशाबरोबर शाळेचे ही नाव मोठे होत असते. त्यामुळे शाळेच्या वैभवामध्ये माजी विद्यार्थ्यांची भूमिकाही महत्वपूर्ण असते. तीच भूमिका रोपळे विद्यालयातील 1994-95 च्या इयत्ता दहावीच्या बॅचमधील विद्यार्थी सार्थपणे पार पाडत असल्याने त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन बँक ऑफ बडोदा शाखा रोपळेच्या शाखाधिकारी सौ सविता घाडगे यांनी केले.
पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील श्री शिवाजीभाऊ पाटील विद्यालयातील 1994 95 मधील दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या चौथे स्नेहसंमेलन व सन्मान सोहळ्याप्रसंगी सौ घाडगे अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. पुढे बोलताना त्यांनी बँकिंग क्षेत्रातील माहिती देऊन या बॅचच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी कार्यक्रमासाठी माजी मुख्याध्यापक माणिक चौधरी, पांडुरंग यादव, माजी जिप अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, मुख्याध्यापक बिभीषण पाटील यांच्यासह अश्विनी फाळके, सरपंच शशिकला गायकवाड, गौरी खिस्ते, रेश्मा माळी, संजीवनी वेदपाठक, नंदिनी पवार, महेश लटके, दादा रोकडे, डॉ. पंडित माळी, दादासाहेब लोखंडे, गणेश आढवळकर, दशरथ कदम, गणेश पाटील, संभाजी गोडसे, आनंद पाटील, सलीम पठाण, बिनु पवार, समाधान खळसोंडे, नवनाथ गुरव, दूधेश्वर देशमुख दत्ताभाऊ भोसले, गणपत कदम आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी विविध क्षेत्रांमध्ये यश मिळविलेल्या माजी विद्यार्थ्यांचा तसेच विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक सोमनाथ जगताप यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी तर आभार दत्ताभाऊ भोसले यांनी मानले.
शाळेचे ऋण अन् आपली सामाजिक जबाबदारी
आपल्या जीवनात शाळेचे अनेक ऋण आपल्यावर असतात. ते ऋण जोपासने ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. त्यातूनच विद्यार्थ्यांच्या सन्मानासह अनेक कौतुकास्पद सामाजिक उपक्रम आमच्या बॅचकडून राबविले जात आहेत. याच कार्याला हातभार म्हणून आपण विद्यार्थ्यांसाठी बक्षिसांची घोषणा केली आहे.
अश्विनी फाळके
माजी विद्यार्थिनी, रोपळे विद्यालय
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा