शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातून होत आहे अभिनंदनाचा वर्षाव
शिवशाही वृतसेवा बार्शी
कला शिक्षक व कला विषय सक्षम करावा यासाठी संपूर्ण राज्यात सातत्याने कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी, सुलाखे हायस्कूलचे कलाशिक्षक रामचंद्र इकारे, यांची निवड झाली आहे.
रामचंद्र इकारे हे बार्शी येथील कलाशिक्षक असून, त्यांनी चित्रकला, नाटक, अभिनय, कविता, व लघुपट अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याचबरोबर नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध संस्था, व कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी मंच उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्य कला शिक्षक महासंघाचे जबाबदारीच्या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे.
राज्य कला शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष विनोद इंगोले, राज्य उपाध्यक्ष प्रल्हाद शिंदे हस्तेकर, राज्य सरचिटणीस प्रल्हाद साळुंखे, यांनी रामचंद्र इकारे यांना प्रदेश उपाध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र दिले आहे. रामचंद्र इकारे यांनी विविध साहित्यिक, सामाजिक संस्थांमध्ये कार्यात्मक योगदान दिले आहे. इकारे यांनी कलाशिक्षक महासंघात यापूर्वी कोल्हापूर व पुणे विभागीय कार्याध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांच्या निवडीबद्दल राज्य कार्यकारणी मधील सुनील महाले, राजेश निंबेकर, विवेक महाजन, नवाब शहा, रमेश तुंगार, सुहास पाटील, महिला आघाडी प्रमुख नीता राऊत, यासह विभाग प्रमुख मोहन माने, बाळासाहेब कोकरे, महेंद्र निकुंभ, चंद्रकांत लिंबेकर, गजानन भुरळ, उमेश पवार, प्रभाकर शेलार, पी.डी. बाविस्कर, राजेंद्र भदाणे, पुणे विभाग सचिव दिलीप पवार, यांच्यासह सोलापूर जिल्हाध्यक्ष संजय पवार, सचिव सावता घाडगे, कोषाध्यक्ष शिवभूषण ढोबळे, बार्शी तालुका अध्यक्ष हरिदास कुंभार, सचिव मुकुंद पाटील, सुलाखे हायस्कूल चे प्राचार्य, अण्णासाहेब पाटकुलकर, उपमुख्याध्यापक स्वामीराव हिरोळीकर, पर्यवेक्षक रामकृष्ण इंगळे, संस्थेचे संचालक प्रसन्न देशपांडे, क्रीडाशिक्षक समीर वायकुळे, वैभव कदम, कला शिक्षक दीपक माने, आदींनी अभिनंदन केले आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा