इंदापूर येथील श्रावण बाळ आश्रमात मुलांसोबत केक कापून व फळे आणि मिठाई वाटून वाढदिवस साजरा
शिवशाही वृतसेवा इंदापूर
माढा तालुक्यातील आलेगाव बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते ज्योतीराम राजगुरू यांनी आपला वाढदिवस सालाबाद प्रमाणे विधायक कार्याने साजरा केला आहे ज्योतीराम राजगुरू हे एक सामाजिक कार्यकर्ते असून ते नेहमीच वेगवेगळ्या चळवळीत सक्रिय असतात सध्या ते प्रहार शेतकरी संघटना कोंडा भाग विभाग प्रमुख आहेत
आज-काल तरुणांमध्ये हॉटेलमध्ये जाऊन दारू पिणे , कर्कश्य संगीत लावून धिंगाणा घालत नाचणे अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याची पद्धत रूढ झाली आहे मात्र ज्योतीराम राजगुरू यांनी असे न करता इंदापूर येथील लहान मुलांचा आश्रम श्रावण बाळ येथे येथील मुलांबरोबर केक कापून व त्यांना फळे वाटप, मिठाई वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला
यापूर्वीसुद्धा ज्योतीराम राजगुरू यांनी दरवर्षी आपला वाढदिवस वेगवेगळे विधायक काम करून साजरा केलेला आहे गेल्या वर्षी टेंभुर्णी येथील गोविंदाश्रम मध्ये वाढदिवस साजरा केला तर ह्या यावर्षी इंदापूर येथील लहान मुलांचा आश्रम श्रावणबाळ येथे साजरा केला सामाजिक बांधिलकी म्हणून ज्योतीराम राजगुरू यांनी आजपर्यंत अनेकदा रक्तदान देखील केले आहे
यावर्षी इंदापूर येथील श्रावण बाळ या आश्रमात त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला यावेळी सह्याद्री ऑटो चे विक्री प्रतिनिधी प्रतीक शिंदे हे त्यांच्यासोबत उपस्थित होते
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा