रुग्ण हक्क परिषदेच्या हॉस्पिटलमध्ये अद्ययावत सुसज्ज शस्त्रक्रिया विभाग सुरू
शिवशाही वृत्तसेवा पुणे
कोविड काळामध्ये हंगामी पद्धतीने सुरु केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलनंतर पुण्यातील कोंढवा भागामध्ये रुग्ण हक्क परिषदेने अद्ययावत आरएचपी हॉस्पिटल या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू केले. या हॉस्पिटलमध्ये अद्ययावत सुसज्ज शस्त्रक्रिया विभाग आणि अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला आहे.
'आधी पैसे - मग उपचार' किंवा पैसे असतील तरच शस्त्रक्रिया असे लाखो रुपये घेतल्याशिवाय पुण्यासह राज्यातील कुठल्याही हॉस्पिटल मध्ये कोणत्याही प्रकारचे उपचार केले जात नाहीत. रुग्णांचे हक्क आणि अधिकार गुंडाळून ठेवण्याचे प्रकार सर्वत्र घडत असताना रुग्ण हक्क परिषदेने रुग्णांच्या हक्काला प्राधान्य देणारे आरएसपी हॉस्पिटल अद्ययावत पद्धतीने उभे करून इतर हॉस्पिटल चालकांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
शस्त्रक्रिया विभाग, अतिदक्षता विभाग आरएचपी हॉस्पिटल मध्ये संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरू करण्यात आले. यावेळी त्यांच्यासह शांताराम खलसे, दशरथ माटवणकर, महेश अठरे, अमोल गीते, शशिकांत लिंबारे, डॉ. सलीम आळतेकर, चंद्रकांत सरवदे आणि परिषदेच्या अपर्णा साठ्ये उपस्थित होत्या.
पुणे शहरासह पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना आरएचपी हॉस्पिटलच्या निर्मितीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. रुग्ण हक्क परिषद आणि पृथ्वी मेडिकल फाउंडेशन या संयुक्त संस्थांनी आरएचपी हॉस्पिटल ची निर्मिती केली आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा