maharashtra day, workers day, shivshahi news,

मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अभिजीत पाटील यांना कोविड योध्दा पुरस्कार प्रदान

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडून व खासदार श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडून सन्मान संपन्न

Minister Eknath Shinde, Abhijeet Patil, Covid Warrior Award, Shiv Sena, thane, mumbai, shivshahi news

शिवशाही वृत्तसेवा मुंबई

रविवार दि.१४ ठाणे येथील काशीनिथ घाणेकर नाट्यगृह येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष व खा.डाॅ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रोजी उस्मानाबाद येथील धाराशिव साखर कारखान्यात देशातील पहिला ऑक्सिजन प्रकल्प उभारून लाखो रूग्णांची मनोभाव सेवा केली त्याबद्दल नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री, श्री.एकनाथजी शिंदे साहेब, विधी न्याय राज्यमंत्री कु.आदितीताई तटकरे, राज्यमंत्री श्री.बच्चूभाऊ कडू, ठाणे खासदार श्रीकांत शिंदे, पारनेरचे आमदार श्री.निलेश लंके, श्री.नितीनजी बानुगडे पाटील, पद्मश्री डाॅ.श्री.तात्याराव लहाने, पत्रकार संघटना अध्यक्ष राजा माने, एबीपी माझाचे राजीव खांडेकर यांच्या हस्ते "कोविड योद्धा सन्मान पुरस्कार" धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना सन्मानित करण्यात आले. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुडवडा जाणविल्याने देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी महाराष्ट्रातील साखर कारखान्यांत ऑक्सिजन निर्मिती करावी असे अवाहन केले असता त्यास प्रथम पुढाकार घेत धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी स्वतःच्या उस्मानाबाद येथील धाराशिव साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्प बंद ठेवून लाखो रूपयांचे नुकसान करून १५दिवसांत ऑक्सिजन प्रकल्प उभारून ऑक्सिजन हाॅस्पिटलला पुरविण्यात यशस्वी झाले त्यांच्या या कार्याचे कौतुक महाराष्ट्राभर झाले.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !