पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने श्री.किसन सरवदे सर याचा सत्कार
पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी मा. श्री किसन सरवदे सर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्यच्या वतीने समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री रामचंद्र सरवदे तसेच पंढरपुर तालुका अध्यक्ष श्री प्रशांतजी माळवदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शिवशाही वृत्तसेवा
सत्कारमूर्ती श्री किसन सरवदे सर यांनी गेल्या 40 वर्षांपासून स्वर्गीय आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्यासोबत काम केले आहे. सरवदे सर यांची काम करण्याची उत्कृष्ट पद्धत, तसेच त्यांच्याविषयी असलेला पांडूरंग परिवारांचा विश्वास आणि गेल्या चाळीस वर्षात त्यांनी केलेले निस्वार्थ कामाची दखल घेत पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार प्रशांतराव परिचारक यांनी मा. श्री किसन सरवदे सर यांची संचालक पदी बिनविरोध निवड केलेली आहे. नुकतेच काही दिवसापूर्वी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याला देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना म्हणून गौरविण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील श्री पांडुरंग साखर कारखाना श्रीपुर हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे. पांडुरंग सहकारी साखर कारखाना हा नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि. नवी दिल्ली यांच्या वतीने देण्यात येणारा वसंतदादा पाटील ‘सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार’ 2021 चा मानकरी ठरला आहे. या कारखान्याने आत्तापर्यंत देश व राज्य पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना म्हणून गाळप हंगाम 2020-2021 मध्ये श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे हा पुरस्कार देण्यात येत आहे.
अशा या कारखान्याच्या संचालक पदी बिनविरोध निवड होणे ही बाब अत्यंत अभिमानास्पद असून गेल्या चाळीस वर्षात मी केलेल्या कष्टाचे मला फळ मिळाले. अशी प्रतिक्रिया सत्कारमूर्ती किसन सरवदे सर यांनी रोखठोकशी बोलताना व्यक्त केली.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष माननीय यशवंत पवार सुरक्षा समितीचे राज्य सचिव डॉक्टर अशिषकुमार सूना यांनी देखील किसन सरवदे सर यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
सदर सत्कार समारंभ कार्यक्रमास पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष श्री. रामचंद्र सरवदे , पंढरपूर तालुका अध्यक्ष श्री प्रशांत माळवदे, श्री विश्वास पाटील, श्री चैतन्य उत्पात, विनोद पोतदार, श्री सचिन कुलकर्णी, श्री दत्ता पाटील, श्री रवींद्र शेवडे, कबिर देवकुळे, सूर्याजी भोसले, अशपाक तांबोळी, विजयकुमार मोटे, संभाजी वाघोले, महादेव भोसले, ज्ञानेश्वर भोसले , आदी पत्रकार उपस्थित होते.. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार प्रशांत माळवदे यांनी केले तर उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचे आभार जिल्हाध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी मानले..
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा