मनोहर मामा भोसले यांची बँक खाते गोठवले
करमाळा - प्रतिनिधी
स्वतःला संत आणि बाळूमामांचा वंशज म्हणून घेणारा मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले याला चार दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी त्यांचे आयसीआयसीआय बँकेत असलेले बचत खाते शील केले आहे. बलात्कार प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदूबाबा मनोहर भोसले याला करमाळा पोलिसांनी बारामती पोलिसांकडून ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला करमाळा न्यायालयात उभे केले, असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, मात्र तो आजारी पडल्याने त्याला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्याच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयापुढे उभे केले असता, मंगळवारी चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी त्याचे आयसीआयसीआय बँकेतील बचत खाते पोलिसांनी शील केले. त्याच्या खात्यावर 43 लाख रुपये शिल्लक असल्याचे समजते. त्याची आणखी इतर कोणत्या बँकेत खाती आहेत का? याचा तपास सुरू आहे. मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले तपासादरम्यान विचारण्यात येणार्या प्रश्नांना, केवळ माझे नशीब असे उत्तर देत असल्याचेही समजते. बलात्कार प्रकरणातील त्याचे दोन साथीदार अद्यापही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा