maharashtra day, workers day, shivshahi news,

पंढरपूर तालुक्यात लवकरच बायोगॅस प्रकल्प सुरु होणार - रोपळ्यात सभासद शेतकऱ्यांसाठी संपर्क कार्यालयाचे उदघाटन

महापद्म प्रोड्युसर व नंदादीप फ्युएल कंपनी ओझेवाडी रोड नेपतगाव  पंढरपूर येथे उभारणार प्रकल्प 

MCL, mahapadm producer, nandadeep Biofuels project, pandharpur, opining, shivshahi news,
संपर्क कार्यालयाचे उदघाटन करताना मान्यवर

पंढरपूर - प्रतिनिधी
भारत इंधनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनावा, हे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, यांचे स्वप्न सत्यात आणायचे असेल, तर जैव इंधन हाच पर्याय आहे.  त्यामुळे बायोगॅस यासारख्या इंधनाच्या माध्यमातून माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे स्वप्न तर पूर्ण होईलच, त्याचबरोबर पर्यावरणातील प्रदूषण कमी होईल, आणि शेतीप्रधान देशातील शेतकऱ्यांना सुद्धा चांगल्या आर्थिक उत्पन्नाचा पर्याय देता येईल.  हा उद्देश समोर ठेवून एम सी एल कंपनी देशभर बायोगॅस प्रकल्प उभे करत आहे या प्रत्येक प्रकल्पातून रोज एक लाख किलो सीएनजी व पीएनजी उत्पादित होणार आहे त्यासाठी पहिल्या टप्प्यात पंढरपूर तालुक्यात हा बायोगॅस प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे.  

MCL, mahapadm producer, nandadeep Biofuels project, pandharpur, opining, shivshahi news,
रोपळ्यात संपर्क कार्यालयाचे उदघाटन 

     महापदम प्रोड्युसर कंपनीच्या साह्याने, एड. भिमराव कोंडुभैरी चेअरमन असलेल्या नंदादीप बायो फ्युएल कंपनीचा  प्रकल्प ओझेवाडी रोड, नेपतगाव, तालुका पंढरपूर, येथे लवकरच सुरू होत आहे.  त्यासाठी नेपियर गवत उत्पादक शेतकऱ्यांना सभासद करून घेणे, तसेच संपर्कासाठी पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे गट सेंटर सुरू केलेआहे.  कंपनीच्या संचालकांपैकी एक असलेले, डॉक्टर हनुमंत खपाले यांनी हे सेंटर सुरू केले आहे.  या कार्यालयाचे उद्घाटन महापद्म प्रोडूसर कंपनीचे पीआरवो किशोर सोनवले, डायरेक्टर रामचंद्र शेळके, संतोष चव्हाण, दिग्विजय बाजारे, आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोपळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, दिनकर कदम हे होते, तर रोपळ्याच्या विद्यमान सरपंच शशिकला चव्हाण, उपसरपंच हनुमंत कदम, ग्रामपंचायत सदस्य अनिल कदम, नितीन कदम, जनक भोसले, मधुकर गुंजाळ, अशोक पाटोळे, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. 
        मान्यवरांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.  डॉक्टर हनुमंत खपाले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.  त्यानंतर कंपनीचे पीआरवो किशोर सोनवले,यांनी कंपनीच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली.  कंपनीचे संचालक रामचंद्र शेळके, दिग्विजय बाजारे, संतोष चव्हाण, यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले.  सभासद झालेल्या शेतकऱ्यांनी, यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.  सध्या कोणत्याच शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.  अशा वेळी नेपियर गवत हा एक चांगला पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध झाला आहे.  याबद्दल समाधान व्यक्त करुन शेतकऱ्यांनी, कंपनीने  गावात गट सेंटर सुरू केल्याबद्दल धन्यवाद दिले.  तालुक्यातील सर्वाधिक सभासद नोंदणी रोपळे येथे झाली असल्याने कंपनीने सुद्धा रोपळ्याच्या दोन होतकरू तरुणांना नोकरीत सामावून घेतले आहे.  या कार्यक्रमाला रोपळे तसेच परिसरातील शेतकरी सभासद नेपियर ग्रास उत्पादन व ग्रामस्थ हजर होते.

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !