लायन्स क्लबच्या वतीने योगशिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव
पंढरपूर - प्रतिनिधी
पंढरपूर येथील योग विद्या धाम ने घेतलेल्या योग शिक्षक प्रशिक्षण वर्गाच्या पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या योग शिक्षकांचा पदविका प्रदान सोहळा संपन्न झाला. सावरकर वाचनालय येथे आयोजित या समारंभाच्या अध्यक्षस्थानी सौभाग्यवती विनयाताई उमेशराव परिचारक, या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून, यश नागेश भोसले यांच्यासह, योग विद्या धामचे प्रवर्तक आणि प्राचार्य अशोक वसंत ननवरे व मुख्य योग्य शिक्षिका सौभाग्यवती संगिता अशोक ननवरे, तसेच योगशिक्षक शाहूराज जाधव, स्वाती ननवरे, सुनील याळगट्टीकर, गीता जामदार, आणि पाठ निरीक्षक तथा परीक्षक आशिष शहा आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. पंढरपूर येथील योग विद्या धाम, योगशिक्षक प्रशिक्षणवर्ग आयोजित करत असते. यामध्ये पदविका, पदवी, याबरोबरच अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. योगशिक्षक पदविका अभ्यासक्रम वर्गाला या वर्षी 60 प्रशिक्षणार्थींनी प्रवेश घेतला होता.
एक वर्षाच्या अभ्यासक्रमात योगा, प्राणायाम, आणि योगासने याबाबत अनेक प्रशिक्षण उपक्रम वर्षभर राबविण्यात आले. कोरोनावर प्रभावी असणारे जलनेती अभियान यामध्ये लक्षवेधी ठरले, असून या अभियानाअंतर्गत वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेकांना, या योग्य शिक्षकांनी जलनेती प्रशिक्षण व प्रात्यक्षिके दिली आहे. लायन्स क्लबचे अध्यक्ष तथा नगरसेवक विवेक परदेशी, यांच्या संकल्पनेतून जलनेती अभियानात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या योग्य शिक्षकांचा गौरव यावेळी लायन्स क्लबच्या वतीने सन्मानचिन्हे देवून करण्यात आला. योग विद्या धाम च्या परीक्षेला बसलेल्या ४६ पैकी सर्व प्रशिक्षणार्थी उत्तीर्ण झाले, असून संस्थेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. सर्व उत्तीर्ण योग शिक्षकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते, पदविका प्रदान करण्यात आल्या.
या समारंभात योग शिक्षक प्रशिक्षण वर्गातील प्रशिक्षणार्थींनी योगासनावर आधारित सुंदर नृत्य आविष्कार सादर केला. यावेळी योग विद्या धाम चे प्राचार्य अशोक ननवरे व प्रशिक्षक सुनील याळगट्टीकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच प्रशिक्षणार्थींनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या. शेवटी शुद्ध सात्विक आहार असलेल्या पौष्टिक पदार्थ पासून बनवलेल्या भेळ व सोया कॉफी असा अल्पोपहार उपस्थितांना देण्यात आला
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा