लायन्स क्लब ऑफ पंढरपूरचा उपक्रम
पंढरपूर - प्रतिनिधी
लायन्स क्लब ऑफ पंढरपूर च्या वतीने कॉलेज चौक जवळील भागांमधील गरीब मुलांना पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले. रॉबिन हूड आर्मी चे सदस्य श्री. दिपक सगर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम पार पडला. सदर प्रसंगी ४५ मुले व २५ पालक उपस्थित होते.या कार्यक्रमास लायन्स अध्यक्ष विवेक परदेशी यांनी लहान मुलांसाठी पौष्टिक आहाराची व्यवस्था केली तसेच लायन्स क्लबच्या ज्येष्ठ सदस्य सुरेखाताई कुलकर्णी व सिमाताई गुप्ता यांनी सदर मुलांसाठी कॅडबरी व खाऊ वाटप केला.
सदर भागातील मुलांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी रॉबिनहुड आर्मी पुढे येऊन मदत करत आहे याबद्दल प्रतिनिधी श्री दिपक सगर व श्री विनायक लोखंडे यांचे लायन्स संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व या बालकांना शिक्षणासाठी, त्यांच्या विकासासाठी काही आवश्यकता असल्यास आम्ही त्या बऱ्यापैकी पूर्ण करू असे आश्वासन लायन्स अध्यक्ष विवेक परदेशी यांनी या प्रसंगी दिले. लायन्स सदस्यांनी मुलां बरोबर गप्पाटप्पा करत त्यांना मार्गदर्शन केले व त्यांचे मनोबल वाढवले आणि त्यांना कुठल्याही शैक्षणिक गोष्टींची आवश्यकता असल्यास आम्ही आपल्या सोबत असल्याचे सांगितले. रॉबीनहुड आर्मीच्या वतीने लायन्स संस्थेचे आभार मानण्यात आले.
सदर कार्यक्रमास श्री रा.पा.कटेकर, उपाध्यक्ष सौ मृणाल गांधी, सचिवा ललिता कोळवले, सुरेखाताई कुलकर्णी, सौ.सीमाताई गुप्ता, सौ. सुनिता परदेशी, सौ.अंजली दिपक माढेकर, सौ पदमा विजय सुपेकर आदी उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा