अभियंता दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने नगर अभियंता नेताजी पवार व अभियंता प्रशांत मोरे यांचा सन्मान
पंढरपूर - प्रतिनिधी
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती अर्थात अभियंता दिनानिमित्त नगर अभियंता नेताजी पवार व अभियंता प्रशांत मोरे यांचा, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने, सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेंद्र कोरके पाटील, साप्ताहिक राष्ट्रसंताचे संपादक राधेश बादले पाटील, व सरपंच दिनकर दाजी चव्हाण यांच्या हस्ते या अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला.
पत्रकार कुमार कोरे यांनी प्रस्तावना केली, तर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पंढरपूर शहर व तालुका अध्यक्ष, प्रवीण नागणे यांनी या कार्यक्रमाची भूमिका विशद केली.
" मी या भागातला असल्याने आपल्या भागाच्या विकासात आपला सहभाग आहे ही भावना आनंददायी आहे. कोरोनामुळे गेल्या काही दिवसात हवे तसे काम करता आले नाही, परंतु नजीकच्या भविष्यात आणखी चांगले काम करून पंढरपूरचा लौकिक वाढवायचा आहे", अशा भावना नगर अभियंता नेताजी पवार यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या. " पत्रकारांचे शासनाच्या कामात नेहमीच सहकार्य लाभले आहे. चुकीला चूक आणि चांगल्याला चांगले म्हणण्याचे धारिष्ट्य पंढरपूरच्या पत्रकारांमध्ये आहे" , असेही ते यावेळी म्हणाले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला, राजेंद्र कोरके पाटील, राधेश बादले पाटील, संतोष रणदिवे पाटील, प्रवीण नागणे, संतोष माने, सचिन कुलकर्णी, कुमार कोरे, नागेश आदापुरे, रवी कोळी, खंडू राक्षे, अनिल विभूते, आदी पत्रकार मंडळी उपस्थित होते. शेवटी संतोष रणदिवे पाटील यांनी मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानले.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा