श्री विठ्ठल चरणी भक्तांनी अर्पण केल्या लाखोंच्या देणग्या
![]() |
vitthal rukmini |
नुकतीच जुलै महिन्यामध्ये 20 तारखेला या वर्षीची आषाढी वारी संपन्न झाली. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मर्यादित वारकर्यांच्या उपस्थितीत, वारी पार पडली असली तरी, श्री विठ्ठल-रुक्मिणी वर महाराष्ट्रातील वारकऱ्यांची नितांत श्रद्धा आहे. त्यामुळे अनेकजण विविध प्रकारे श्री विठ्ठल चरणी काहीतरी अर्पण करत असतात. जुलै महिन्यात श्री विठ्ठल चरणी लाखोंच्या देणग्या भक्तांनी अर्पण केल्या आहेत.
त्यामध्ये दिनांक 4 जुलै रोजी पुणे येथील विठ्ठल भक्त संजय नारायण पवार यांनी 728 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या दोन विटा, तसेच पाच तारखेला अंबेजोगाई तालुक्यातील पट्टीवडगावचे विठ्ठलभक्त दत्तात्रय हरीभाऊ जाधव यांनी एक लाख रुपये, तर आठ जुलै रोजी ज्योती लिंबाजी राऊत, या फलटणच्या भक्ताने एक लाख रुपये, आणि 11 जुलै रोजी साई नगर अकलूज येथील विठ्ठल भक्त सौ. सुशीला अरुण माने यांनी, एक लाख दहा हजार एकशे अकरा रुपये, तर 17 जुलै रोजी ओंकार जोशी यांनी पंढरपूरचे विठ्ठल भक्त विठ्ठल ऐतवाडकर यांच्या नावे एक लाख रुपये, आणि 29 जुलै रोजी नांदेड जिल्ह्यातील गोधडी येथील विठ्ठल भक्त श्रीमती भागीरथीबाई लक्ष्मणराव जाधव यांनी एक लाख रुपयांची देणगी श्री विठ्ठल चरणी अर्पण केली आहे. या सर्व देणगीदार भक्तांचा, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने, श्री विठ्ठलाची प्रतिमा, विठ्ठलाचा प्रसाद रूपी उपरणे, तर रुक्मिणी मातेच्या प्रसाद रुपी साडी आणि दैनंदिनी देऊन सत्कार करण्यात आला.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा