maharashtra day, workers day, shivshahi news,

स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणा निमित्ताने वह्या वाटप कार्यक्रम संपन्न

नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांच्या अध्यक्षतेखाली युवा नेते रोहन परिचारक यांच्या शुभहस्ते गरजु विद्यार्थ्यांना वह्या वाटप

sudhakar paricharak, sadhanatai bhosale, vivek pardeshi , lions club , pandharpur shivshahi news,
गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करताना मान्यवर

       

 लायन्स क्लब ऑफ पंढरपूरच्या वतीने नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांच्या अध्यक्षतेखाली युवा नेते रोहन परिचारक यांच्या शुभहस्ते गरजु विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. साई जिम ,परदेशी नगर येथे सायंकाळी ५ ते ८ या वेळेत सदर उपक्रम पार पडला. स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्षा सौ भोसले यांच्या हस्ते झाले व वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. गरजु विद्यार्थ्यांना आवाहन करुन नावनोंदणी करुण सदर उपक्रम नियोजन बध्द राबविण्यात आला असल्याचे लायन्स अध्यक्ष विवेक परदेशी यांनी सांगितले व यापुढे ही आम्ही विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम, स्पर्धा , व्यक्तीमत्व विकास शिबीर राबवणार असल्याचे सांगितले. सदर वह्या लायन्स अध्यक्ष श्री परदेशी यांनी स्पॉन्सर केल्या. 

      

     सदर कार्यक्रमात स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भागवताचार्य स्व.वा.ना. उत्पात यांनी लिहलेला सा.पंढरी प्रहार मधील लेख पुनरप्रकाशीत करण्यात आला.माजी नगरसेवक श्री अमरनाथ परदेशी यांचे सदर विषेश उपक्रम राबवला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ललीता कोळवले यांनी केले तर आभार रा.पा.कटेकर यांनी मानले. सदर कार्यक्रमास गटनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, धर्मराज घोडके, नगरसेवक विजय वरपे , वाडेकर सर, माजी नगरसेविका कमलताई तोंडे, अदित्य जोशी, डि.व्ही. कुलकर्णी, दिपक येळे, मिलींद येळे, विजय खंडेलवाल, रोहन देशपांडे, गणेश देसाई, दिपक थिटे, कैलास करंडे, ला.राजेंद्र गुप्ता,ला.ईम्रान मुल्ला, ला.अमित गडम, ला.सुरेखाताई कुलकर्णी, ला.सिमा गुप्ता, ला.शोभा गुप्ता आदि उपस्थित होते.

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !