विकासकामांमुळे गावाचे स्वरूप पूर्णपणे बदलेल - आमदार राणा जगजितसिंह पाटील
तुळजापूर - प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील अपशिंगा येथे उस्मानाबाद - तुळजापूर चे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले . आपसिंगा ते सरीचा तांडा रस्त्याची अनेक दिवसांची मागणी होती. या अनुषंगाने रु.८४ लक्ष खर्च करून या रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे. तसेच देवी मंदिरासमोरील सभामंडप, राम मंदिरासमोरील सभागृह दुरुस्ती, आपसिंगा बेगडा रस्ता क्रं.०६, तीनखणी गणपती मंदिर सभागृह, बंधिस्त नाली, गावाअंतर्गत हायमास्ट बसविणे, आपसिंगा ते कात्री संगमनेर रस्ता, घन कचरा व सांडपाणी व्यवस्थापन, माळी गल्ली येथील सिमेंट रस्ता. सरीचा तांडा येथे सिमेंट रस्ता, महात्मा फुले नगर पाणी पुरवठा, १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत बंदिस्त नाली, माळी गल्लीतील नवीन पाईपलाईन, जुने भीमनगर येथे सभागृह दुरूस्ती, जुने भीमनगर येथे बंदिस्त नाली व हायमास्ट, पाझर तलावाची दुरुस्ती, कोल्हापुरी बंधारा गेट, पशु वैद्यकीय इमारत बांधकाम इ. विकासकामे करण्यात येणार आहे.
तुळजापूर तालुक्यातील अपशिंगा येथे भूमिपूजन प्रसंगी बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले कि , "संपूर्ण विकासकांची किंमत .२ कोटी ४६ लक्ष रुपये इतकी असून, संबंधित कामांसाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला आहे." "सर्व कामं पूर्ण होईपर्यंत आपण स्वतः जातीने लक्ष घालणार आहे, या निधी अंतर्गत होणाऱ्या विकासकामांमुळे गावाचे स्वरूप पूर्णपणे बदलेल.' असेही पुढे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले .
मजबूत रस्ते, उत्तम आरोग्य, स्वच्छ पाणी, परिसरातील स्वच्छता, सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन होऊन ग्रामस्थांचे जीवनमान सुधारेल. यापुढे देखील गावाच्या विकासासाठी भरघोस निधी मिळवुन देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा