सर्वांच्या सहकार्याने काम करणार - श्रीराम बडवे
![]() |
श्रीराम बडगे यांना निवडीचे पत्र देताना पदाधिकारी |
पंढरपूर : प्रतिनिधी
स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती आधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री मा दिपक कांबळे सर, राष्ट्रीय महासचिव श्री कमलेश शेवाळे (देवा) व राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्री अमरजी बेंद्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वजीर शेख आणि महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख तथा सचिव श्री रविंद्र सुर्यवंशी यांच्या शिफारशीनुसार श्रीराम दत्तात्रय बडवे यांची पोलीस मित्र संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
निवड झाल्यानंतर श्रीराम बडवे यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. आणि हे समाजकार्य आपण सर्वांच्या सहकार्याने योग्य पद्धतीने करू तमाम पोलीस बांधवांच्या मदतीसाठी सहकार्य करू प्रयत्न करू . यावेळी त्यांचे चैतन्य कन्स्ट्रक्शनचे श्री शिवाजी पिसे साहेब यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले यावेळेस पोलीस मित्र संघटनेच्या पदाधिकारी पंढरपूरच्या सौ. धनश्री उत्पात, महाराष्ट्र प्रमुख संपर्कप्रमुख श्री नागटिळक, पंढरपूर तालूका अध्यक्ष श्री संजय शेटे पोलीस मित्र पंढरपूर उपस्थित होते यांनीही श्रीराम बडवे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा