रघुकुल सोसायटीमध्ये लायन्स चिल्ड्रेन हेल्थ पार्कचे उदघाटन
पंढरपूर - ( प्रतिनिधी )
येथील ठाकरे चौकातील रघुकुल सोसायटीमध्ये असलेल्या राम मंदिरासमोरील खुल्या जागेमध्ये नगर परिषदेच्या सहयोगातून लायन्स क्लब पंढरपूर आणि मणप्पुरम फायनान्स यांच्या संयुक्त विद्यमाने ५. ७५ लाख रुपये खर्चून चिल्ड्रेन हेल्थ पार्क उभारण्यात आले आहे. या पार्कचे उदघाटन, विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक , पंढरपूरच्या नगराध्यक्षा सौ. साधना ताई भोसले, लायन्स क्लबचे प्रथम उपप्रांतपाल राजशेखर कापसे या मान्यवरांच्या हस्ते व लायन्स क्लब ऑफ पंढरपूरचे अध्यक्ष तथा नगरसेवक विवेक परदेशी, लायनेस क्लबच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी माने, रघुकुल सोसायटीचे चेअरमन श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने मैदानी खेळाचे अतिशय महत्व आहे. सध्याच्या इंटरनेट व धावपळीच्या जगात, मुलांचे मैदानात खेळणे कमी होत चालले आहे. त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यातच कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगच जणू घरामध्ये कैद झाले आहे. लहान मुलांच्याविषयी काळजीत टाकणारी , कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. अशा एकूण परिस्थितीत लहान मुलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने , रघुकुल सोसायटीमध्ये लायन्स क्लब ऑफ पंढरपूर आणि मणप्पुरम फायनान्स यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे पाऊणे सहा लाख रुपये खर्चून हे चिल्ड्रेन हेल्थ पार्क उभारण्यात आले आहे.
नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले
या चिल्ड्रेन हेल्थ पार्कच्या उदघाटन प्रासंगी नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले यांनी सांगितले कि, " लायन्स क्लब नेहमीच समाजोपयोगी कार्यात अग्रेसर असून, स्थानिकांना उपयोगी पडेल, अशा पद्धतीने सोसायटीतील खुल्या जागेचा वापर केला आहे," त्याबद्दल लायन्स क्लबला त्यांनी धन्यवाद दिले.
लायन्सचे प्रथम उपप्रांतपाल राजशेखर कापसे
" लायन्स क्लबने चिल्ड्रेन हेल्थ पार्क तयार करणे हि आपल्यासाठी आनंदाची बाब असून, पंढरपुरात हे चिल्ड्रेन हेल्थ पार्क होत आहे हे विशेष आहे. यापुढेही लायन्स क्लबकडून पंढरपूरसाठी जे करता येईल, ते आपण करणार आहोत, " असे प्रतिपादन लायन्सचे प्रथम उपप्रांतपाल राजशेखर कापसे यांनी केले.
आमदार प्रशांत परिचारक
" गेल्या काही दिवसांत कोरोनामुळे अर्थकारण ठप्प झाले आहे. त्यामुळे विकासाचा वेगही काहीसा मंदावला असताना, लायन्स क्लब सारख्या संस्था पुढे येऊन शहराच्या विकासाला हातभार लावत आहेत, हि कौतुकाची गोष्ट आहे, " असे गौरवोद्गार आमदार प्रशांत परिचारक यांनी या चिल्ड्रेन हेल्थ पार्कच्या उदघाटन प्रसंगी बोलताना काढले.
या चिल्ड्रेन हेल्थ पार्कच्या उदघाटन कार्यक्रमाला नगरसेवक नागेश भोसले, गुरुदास अभ्यंकर, नवनाथ रानगट, विक्रम शिरसाट , आदित्य फत्तेपूरकर, अक्कलकोटचे गट शिक्षण अधिकारी भांजे साहेब, आर्किटेक्चर सतीश शेटे,इंजिनियर लवटे, रघुकुल सोसायटीचे चेअरमन श्रीकांत देशपांडे, रा.पा. कटेकर,ओंकार बसवंती, मंदार केसकर, आदी मान्यवर तसेच रघुकुल सोसायटीचे सर्व रहिवाशी सदस्य आणि लायन्स क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी रा.पा. कटेकर यांनी सर्व मान्यवर आणि उपस्थितांचे आभार मानले.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा